फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लड महिला T20 मालिका : भारतीय महिला संघ आता इंग्लडविरुद्ध राहिलेल्या T20 मालिकेचा शेवटचा सामना खेळताना दिसणार आहे. आतापर्यत या मालिकेचे चार सामने खेळवण्यात आले आहेत. भारतीय महिला संघाचा आतापर्यत दबदबा पाहायला मिळणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत तीन सामन्यात विजय मिळवला आहे, तर इंग्लडच्या संघाने १ सामना जिंकला आहे. टीम इंडीयाने पाच सामन्याच्या मालिकेमधील ३ सामने जिंकल्यामुळे भारताच्या संघाने ही मालिका जिंकली आहे, तर इंग्लडच्या संघाने १ सामना जिंकला आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात स्मृती मानधना हीने शतक झळकावले होते. या सामन्यात तिने ६५ चेंडूमध्ये 112 धावा केल्या आहेत, यामध्ये तिने 3 षटकार आणि 15 चौकार मारले होते. त्याचबरोबर हरलीन देओल हीने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजीमध्ये चरणी हीने चांगली कामगिरी केली होती आणि 4 विकेट्स घेतले होते. या सामन्यात भारताच्या संघाने 97 धावांनी विजय मिळवला होता.
दुसऱ्या सामन्याचे आयोजन सेट युनिक मैदानावर करण्यात आले होते. या सामन्यात भारताच्या संघाने 24 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये भारतीय संघाची मुळ कर्णधार हरमनप्रीत कौर हिने संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात अमनज्योत कौर आणि जेमिमा रोड्रीक्स या दोघीनी कमालीची कामगिरी केली आहे. जेमिमा रोड्रीक्स हीने या सामन्यात 63 धावा केल्या होत्या तर अमनज्योत कौर हीने देखील नाबाद 63 धावा केल्या होत्या.
4 जुलै रोजी तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात इंग्लडच्या संघासाठी सोफिया डंकले हिने कमालीचा खेळ दाखवला होता संघाला विजय मिळवुन देण्यात मोलाचे योगदान दिले. सोफिया डंकले हिने 75 धावांची खेळी खेळली, तर डॅनी व्याट-हॉज हिने देखील धुव्वाधार खेळी खेळली तिने संघासाठी 66 धावा केल्या. या सामन्यातही भारतासाठी स्मृती मनधना हिने अर्धशतक झळकावले होते.
चौथ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने मालिकेचा तिसरा विजय मिळवुन मालिकेमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये भारतीय महिला गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली होती यामध्ये भारताच्या संघाने इंग्लडला 126 धावांवर रोखले. हे लक्ष भारताच्या संघाने 18 बाॅल शिल्लक असताना पुर्ण केले आणि हा सामना भारताच्या संघाने 6 विकेट्सने जिंकला.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाचवा आणि शेवटचा सामना हा 12 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताचा संघ या सामन्यात विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल.