IND Vs ENG: Rishabh Pant Express Susat! Bhima feat behind the wicket, became the third Indian to do so
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतला सुरवात झाली आहे. लीड्स येथे पहिला सामना खेळवला जात आहे. भारताने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या आहेत तर प्रतिउत्तरात तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर इंग्लंडच्या ६ गडी गमावून ३४९ धावा झाल्या आहेत. या सामन्यात भारताकडून ऋषभ पंतने फलंदाजीसह त्याच्या विकेटच्या मागे राहून देखील जोरदार कामगिरी केली आहे. या कामगिरीसह त्याने मोठी कामगिरी केली आहे. त्याने विकेटकीपिंग करताना कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी १५० झेल घेतले आहेत. असे करणारा तो तिसरा भारतीय विकेटकीपर ठरला आहे.
ऋषभ पंतने आपल्या कामगिरीचा धडाका कायम ठेवत फलंदाजीनंतर विकेटकीपिंगमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर ऋषभ पंतने ऑली पोपचा झेल घेऊन हा पराक्रम केला आहे. पंतचा कसोटी कारकिर्दीतील हा १५० वा झेल ठरला आहे. पंत आता विकेटकीपर म्हणून १५० झेल घेणारा तिसरा भारतीय ठरला आहे, त्याच्या पुढे आधी महेंद्रसिंग धोनी (२५६) आणि सय्यद किरमाणी (१६०) आहेत.
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंड संघासाठी खुशखबर! फलंदाजांना रडवणारा ‘हा’ वेगवान गोलंदाज संघात परतणार
यापूर्वी, शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम केला होता. त्याने एमएस धोनीला मागे टाकत भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा पहिला विकेटकीपरचा मान पटकवला आहे. ऋषभ पंतने त्याचे सातवे कसोटी शतक आणि इंग्लंडविरुद्ध चौथे शतक झळकावले आहे. यादरम्यान त्याने इंग्लंडमध्येच तीन शतके ठोकली आहेत.
Milestone Alert 🚨
Vice-captain Rishabh Pant completes 1⃣5⃣0⃣ catches in Test cricket 👏👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/6ANBpkgmhO
— BCCI (@BCCI) June 22, 2025
ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्ध ठोकालेल्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर तो आता सेना देशांमध्ये शतकांच्या बाबतीत धोनीच्या पुढे निघून गेला आहे. त्याने परदेशात पाच शतकांच्या बाबतीत इंग्लंडच्या लेस एम्सशी बरोबरी साधली आहे. यष्टीरक्षकांमध्ये फक्त अँडी फ्लॉवर (६) आणि अॅडम गिलख्रिस्ट (१०) त्याच्या पुढे आहेत. या शानदार खेळीमुळे ऋषभ पंतने परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत.
ऋषभ पंतने त्याच्या शानदार खेळाच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो ३००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडणारा २७ वा भारतीय फलंदाज बनला आहे. यादरम्यान, पंतने कसोटी क्रिकेटमध्ये ७ शतके आणि १५ अर्धशतके लागावली आहेत. या दरम्यान तो सात वेळा ९० च्या आसपास बाद झाला आहे. अन्यथा त्याच्या शतकांची संख्या वाढली असती.