ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहेत. या सामन्यात पहिल्या डावात शतक भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतने शतक झळकावले आहे.शतक लगावल्यानंतर पंतने गुलाटी उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. ऋषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी क्रिकेटपटूंनीही काही खास प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतने १७८ चेंडूंचा सामना करत १३४ धावा फटकावल्या आहेत.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पंत कदाचित खूप लहानपणापासून जिम्नॅस्टिक्स करत आहे. यामध्ये काहीही चूक नाही. तो असा आहे आणि त्याला असेच राहू द्या. तो खूप वेगळा आहे. त्याने खूप लहानपणापासूनच खूप जिम्नॅस्टिक्स केले आहे.”
हेही वाचा : IND Vs ENG : क्रिकेट विश्वावर शोककळा! लीड्स कसोटीदरम्यान इंग्लंडच्या दिग्गजाने घेतला अखेरचा श्वास..
२०२२ मध्ये पंत एका भयानक कार दुर्घघटनेतून बचावला आहे. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत देखील झाली होती. त्यानंतर, क्रिकेटच्या मैदानावर त्याचे यशस्वी पुनरागमन केले. त्याच्यातील धाडसाचे दर्शन देते. इतक्या शस्त्रक्रियांनंतर असे समरसॉल्ट करणे खरोखरच आश्चर्यकारक असेच आहे.
भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा म्हणाला की, “ऋषभ हा ऋषभ आहे आणि नेहमीच तो काहीतरी वेगळे करत असतो. त्याला हे खूप चांगले जमते. कोणीही विचार केला नव्हता की तो असे काही करेल. मी कधीही असा प्रयत्न केला नाही. यासाठी मला खूप सराव करावा लागेल.”
माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी असे काही देखील करू शकत नाही आणि मी त्याच्यासारखी फलंदाजीही करू शकत नाही. दोन्ही आघाड्यांवर (विकेटकीपिंग आणि फलंदाजी) तो अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो. मी लहान असताना माझ्या पालकांनी मला जिम्नॅस्टिक्समध्ये भाग घेण्यास सांगितले होते. मी प्रयत्न केले पण यशस्वी झालो नाही. पंत उत्तम प्रकारे ते सर्व करतो. मी माझ्या आयुष्यात असे काहीही पाहिले नाही.”
हेही वाचा : IND vs ENG :’..यासाठी कोणते पदक मिळणार नाही’, टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणावर माजी क्रिकेटपटूची आगपाखड..
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ४७१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंतसह शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी देखील शतकं झळकावली आहेत. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने ३ विकेट गमावत २०९ धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी इंग्लंड फलंदाजी उतरला तेव्हा ५ गडी गामावत इंग्लंडने २८६ धावा केल्या आहेत. इंग्लंड सध्या भारतीय संघापेक्षा १८५ धावांनी पिछाडीवर आहे.