IND vs ENG 4th Test: Rishabh Pant is climbing the ladder of success! He has equalled Virender Sehwag in 'this' in Test cricket
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंड संघाने दमदार सुरवात करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २ विकेट गमावून २२५ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या दिवशी पायाच्या दुखापतीने मैदान सोडले होते. परंतु तो दुसऱ्या दिवशी मैदानात फलंदाजीसाठी आला आणि त्याने गुरुवारी (२४ जुलै) ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध ७६ चेंडूत ५४ धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने एका मोठ्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ९० षटकार ठोकले आहेत.
ऋषभ पंतने आपल्या खेळी दरम्यान ९० वा षटकार ठोकताच सेहवागशी बरोबरी साधली. त्याच्या १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सेहवागने भारतासाठी १०३ सामने खेळले असून या दरम्यान त्याने ९० षटकार मारले आहेत. त्याच वेळी, पंतने फक्त ४७ सामन्यांमध्येच हा भीम पराक्रम करून दाखवलाया आहे. पंत मँचेस्टरमध्ये त्याचा केवळ ४७ वाच सामना खेळत आहे. सेहवागला मागे टाकण्यासाठी पंतला चार षटकार मारावे लागणार होते. परंतु या डावात तो फक्त ३ षटकारच मारू शकला. आता जर पंत दुसऱ्या डावात षटकार मारण्यात यशस्वी झाला तर तो सेहवागला मागे टाकण्यात यशस्वी होईल.
हेही वाचा : IND vs ENG: आर. अश्विन गौतम गंभीरवर संतापला! या खेळाडूला वगळण्यावर प्रश्नचिन्ह केले उपस्थित
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार
ऋषभ पंत – ४७ कसोटीत ९०
वीरेंद्र सेहवाग – १०३ कसोटीत ९०
रोहित शर्मा – ६७ कसोटीत ८८
एमएस धोनी – ९० कसोटीत ७८
रवींद्र जडेजा – ८४ कसोटीत ७४
पंतने भारताकडून पहिल्या डावामधेय ७५ चेंडूत ५४ धावा केल्या. या दरम्यान त्याने ३ षटकार लगावले. ११३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला जोफ्रा आर्चरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यष्टीरक्षक-फलंदाजाने डगआउटमध्ये परतण्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदर (९० चेंडूत २७) सोबत सातव्या विकेटसाठी महत्वपूर्ण २३ धावा जोडल्या. तर चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतने साई सुदर्शन (६१ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या आहेत.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाच्या नंतर एका मालिकेत 6 वेळा 350+ धावा करणारा भारत दुसरा देश!
मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक करणारा पंत हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने १०७ चेंडूत ५८ धावा केल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेला सुदर्शनने १५१ चेंडूत ६१ धावा केल्याया आहेत. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ३५८ धावा केल्या आहेत.