भारत विरुद्ध इंग्लंड यांच्याबद्दल सध्या मॅचेस्टर कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचे संघाने पहिला इनिंगमध्ये फलंदाजी करून 358 धावा केल्या आहेत. सदर इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे भारताच्या संघाने दुसऱ्या दिनी दोन विकेट्स घेतले आहेत. भारताच्या संघाने चौथ्या कसोटी मध्ये सहा वेळा 350 आकडा पार करून नवा विक्रम नावावर केला आहे.
६ वेळा 350 हुन अधिक धावा करणारा भारत हा दुसरा देश. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाजांनी या मालिकेत आधीच खळबळ उडवून दिली आहे. टीम इंडिया कदाचित १-२ ने पिछाडीवर असेल पण त्यांनी फलंदाजीत असा विक्रम केला आहे जो त्यापूर्वी फक्त ऑस्ट्रेलियन संघच साध्य करू शकला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
शेवटचे असे ३६ वर्षांपूर्वी १९८९ मध्ये घडले होते. एकाच मालिकेत एका संघाने ६ वेळा ३५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत ही खळबळजनक घटना आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे सुरू आहे. भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. या मालिकेत संघाचा ३५०+ धावांचा हा सहावा डाव आहे. अजूनही एक सामना शिल्लक आहे, म्हणजेच भारताचे अजून ३ डाव शिल्लक आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
भारतापूर्वी, ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे ज्याने कसोटी मालिकेत ६ वेळा ३५०+ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी हा पराक्रम ३ वेळा केला आहे आणि तिन्ही वेळा अॅशेसमध्ये घडले आहे. १९२०-२१, १९४८ आणि १९८९ च्या अॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध ६ वेळा त्यांनी ३५०+ धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
इंग्लंडविरुद्धच्या चालू मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने दोन्ही डावात ३५० पेक्षा जास्त धावा केल्या. लीड्स कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावात ४७१ आणि दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. फोटो सौजन्य - सोशल मिडीया