फोटो सौजन्य – X
सुनील गावस्कर संतापले : भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसऱ्या डावामध्ये भारताच्या संघाने 387 धावा केल्या. तिसऱ्या डाव सुरू आहे या डावाची काल पहिली ओव्हर खेळवण्यात आली होती. यामध्ये कालच्या या शेवटच्या ओव्हर मध्ये दोन्ही संघांमध्ये राडा पाहायला मिळाला. या प्रकरणाचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याचबरोबर अनेक क्रिकेट तज्ञांच्या देखील यावर प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता भारताचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी इंग्लडच्या संघाला फटकारलं आहे.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. हा सामना सध्या बरोबरीत दिसत आहे, कारण तिसऱ्या दिवशी टीम इंडिया देखील ३८७ धावा करून सर्वबाद झाली होती. यानंतर, तिसऱ्या दिवशी इंग्लंडला १ षटक खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यांनी २ धावा करून आघाडी घेतली. दुसरीकडे, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान, माजी भारतीय दिग्गज सुनील गावस्कर यांना इंग्लंडची एकही कृती अजिबात आवडली नाही.
A DISHEARTENING END TO SUCH A COURAGEOUS KNOCK OF RISHABH PANT.
– He was in pain, he was struggling with his finger, but he fought like a warrior. pic.twitter.com/VRtJpKaT9C
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2025
तिसऱ्या दिवशी एका क्षणी रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी उत्सुक केले. त्यानंतर इंग्लंडने ऋषभ पंतविरुद्ध एक खास रणनीती आखली आणि डीप फाइन लेगपासून ते लाँग ऑनपर्यंत ७ ते ८ क्षेत्ररक्षक तैनात केले. या काळात इंग्लंडला शॉर्ट पिच बॉलने पंतला अडकवायचे होते, पण ते शक्य झाले नाही.
दुसरीकडे, इंग्लंडच्या या कृतीवर सुनील गावस्कर संतापलेले दिसले. इंग्रजी समालोचन करताना सुनील गावस्कर म्हणाले की, लेग साईडवर एका वेळी ६ पेक्षा जास्त खेळाडू असू नयेत, हे क्रिकेट नाही. यासंदर्भात त्यांनी आयसीसीला आवाहन केले आणि म्हटले की, खेळण्याच्या परिस्थितीत बदल करून आयसीसीने लेग साईडवर ६ पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक तैनात करण्याची परवानगी देऊ नये.
ऋषभ पंतने पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी केली, जरी त्याला शतक झळकावता आले नाही. तिसऱ्या दिवशी शानदार फलंदाजी करताना ऋषभ पंतने ७४ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवशी पंत धावबाद झाला. याआधी दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पंतने १९ धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात केएल राहुलने शतक झळकावले. याशिवाय रवींद्र जडेजाने ७२ धावांची शानदार खेळी केली.