Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल पुन्हा एकादा चर्चेत आला आहे. त्याचा एक नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे मैदानाबाहेरील कार्यक्रमादरम्यान गिलचा एक वेगळाच पैलू दिसला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 17, 2026 | 04:54 PM
T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! (Photo Credit- X)

T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला!
  • भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका
  • Video व्हायरल
Shubman Gill Dance Video Viral: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला, तरी सोशल मीडियावर मात्र तोच चर्चेत आहे. टी-२० विश्वचषक २०२६ सुरू असतानाच शुभमन गिलचा एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या चुलत भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर आग लावताना दिसत आहे. भारतीय टी-२० संघात स्थान न मिळाल्याने गिल सध्या आपल्या कुटुंबासोबत पंजाबमध्ये वेळ घालवत आहे.

पारंपारिक पेहरावात शुभमनचा ‘स्वॅग’

आपल्या चुलत भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शुभमन गिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्याने गडद मरून रंगाचा पारंपारिक कुर्ता परिधान केला होता. बॉलिवूडच्या काही गाजलेल्या गाण्यांवर शुभमनने जबरदस्त डान्स केला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तो वधूसोबतही डान्स करताना दिसत असून उपस्थितांनी त्याच्या डान्सला दाद दिली. मैदानावर शांत आणि संयमी वाटणारा गिल खासगी कार्यक्रमात किती मनमोकळा असतो, याची प्रचिती या व्हिडिओवरून येत आहे.

When Shubman Gill hits the dance floor 🕺 pic.twitter.com/cWk4pqlErP — Shubman Gill Fc (@ShubmanGill7fc) February 16, 2026

विश्वचषकाच्या संघात का नाही?

भारतीय निवड समितीने टी-२० विश्वचषक २०२६ साठी शुभमन गिलचा संघात समावेश केलेला नाही. खराब फॉर्म किंवा संघ संतुलनामुळे त्याला या मोठ्या जागतिक स्पर्धेतून बाहेर बसावे लागले आहे. मात्र, गिलने खचून न जाता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. नुकत्याच झालेल्या सौराष्ट्र विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात तो पंजाबकडून खेळताना दिसला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ३ सामन्यात २ अर्धशतके झळकावून आपण फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत.

शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदच्या वादग्रस्त हावभावावर रोहित शर्माची प्रतिक्रिया, पहा Video

IPL 2026 मध्ये पुनरागमन आणि कर्णधारपद

शुभमन गिल आता थेट आयपीएल २०२६ च्या हंगामात मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विश्वचषक संपल्यानंतर लगेचच आयपीएलला सुरुवात होणार आहे. शुभमन गुजरात टायटन्स (GT) संघाचे नेतृत्व करत असून फ्रँचायझीने त्याला मेगा लिलावापूर्वीच रिटेन (राखून ठेवणे) केले आहे. भारतीय टी-२० संघात पुन्हा एकदा आपले स्थान पक्के करण्यासाठी गिलसाठी आगामी आयपीएल हंगाम अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

मागील हंगामातील चमकदार कामगिरी

आयपीएल २०२५ मध्ये शुभमन गिलने अत्यंत स्फोटक फलंदाजी केली होती. त्याने १५ सामन्यांमध्ये ५०.०० च्या सरासरीने आणि १५५.८७ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ६५० धावा कुटल्या होत्या. यामध्ये त्याने ६ अर्धशतकेही लगावली होती. हाच फॉर्म कायम राखून पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावण्याचा गिलचा मानस आहे.

शुभमन गिलला पुन्हा T20 संघात खेळण्याची संधी मिळेल का? बीसीसीआयच्या मान्यतेने, अशक्य गोष्ट होईल शक्य!

Web Title: Shubman gill holds a contract on the dance floor at his brothers wedding video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Shubman Gill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.