फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारतीय महिला संघाची काल टी ट्वेंटी मालिका पार पडली यामध्ये भारताच्या संघाला शेवटच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाने पाच सामन्यांच्या t20 मालिकेमध्ये तीन सामने जिंकून ही मालिका नावावर केली. या सह भारताच्या महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करून नवा विक्रम नावावर केला आहे. शेवटच्या सामन्यामध्ये शेफाली वर्मा ही हिची कामगिरी प्रभावशाली राहिली तिने संघासाठी 41 जनरल मध्ये 75 धावा केल्या.
ज्या पद्धतीने एक षटकार आणि 13 चौकार मारले या व्यतिरिक्त इतर फलंदाज हे फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही रिचा घोष हिने कालच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या आधी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली तिने फक्त 24 धावा केल्या. महिला क्रिकेट इतिहासात इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी-२० मालिकेमध्ये विजय आहे संघाने या मालिकेत कमालीची कामगिरी केली. यापूर्वी, भारताने इंग्लंडविरुद्ध ६ द्विपक्षीय टी-२० मालिका गमावल्या होत्या.
A last-ball thriller in Edgbaston!
England win the final T20I by 5 wickets#TeamIndia win the series 3⃣-2⃣ 🙌
Scorecard ▶️ https://t.co/lSqFx9aVLP#ENGvIND pic.twitter.com/DymdFQtMTT
— BCCI Women (@BCCIWomen) July 12, 2025
२००६ मध्ये डर्बी येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवला होता, जो दोन्ही संघांमधील या स्वरूपाचा पहिला सामना होता. या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. शेफालीने २३ चेंडूत तिचे ११ वे टी२० अर्धशतक पूर्ण केले.
गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध रिचा घोषने १८ चेंडूत झळकावलेले अर्धशतकानंतर कोणत्याही भारतीय खेळाडूने या फॉरमॅटमध्ये केलेले हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. शेफाली (७५) बाद झाल्याने भारतीय डाव डबघाईला आला.
रिचा घोष (१४ चेंडूत २० धावा), राधा यादव (१४ चेंडूत नाबाद १४ धावा) आणि अरुंधती रेड्डी (५ चेंडूत नाबाद ९ धावा) यांच्या छोट्या खेळींमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. इंग्लंडकडून चार्ली डीनने सर्वाधिक तीन बळी घेतले. इंग्लंडकडून सोफिया डंकली आणि डॅनिएल वायट-हॉज या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. सोफिया डंकलीने ४६ धावा केल्या, तर डॅनिएल ५६ धावा करून बाद झाली. याशिवाय इंग्लंडची कर्णधार टॅमी ब्यूमोंटने संघासाठी ३० धावा केल्या. भारताकडून दीप्ती आणि अरुंधतीने प्रत्येकी दोन बळी घेतले.
या सामन्यात भारतीय टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौरने तिचा ३३४ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. कौरने माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले. ती भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी पहिली खेळाडू बनली आहे.