फोटो सौजन्य - BCCI Women
भारतीय महिला संघांचा पहिली मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने तीन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. भारताच्या संघाने इंग्लंड दौऱ्यावर पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे.मालिकेच्या पाचव्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या संघाने पहिला दोन सामनमध्ये विजय मिळवला होता त्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता चौथ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून भारताच्या संघाने मालिका नावावर केली होती.
पाचव्या सामन्यांमध्ये टीम इंडीयाच्या महिला फलंदाजांची निराशाजनक कामगिरी राहिली यामध्ये भारताच्या महिला फलंदाजांनी चांगले कामगिरी केली नाही. भारताची फिरकी गोलंदाज राधा यादव हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यामध्ये तिचा अविश्वसनीय कॅच पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तथापि, भारतीय संघाची मुख्य गोलंदाज राधा यादव चर्चेचा विषय राहिली आहे. याचे मोठे कारण म्हणजे तिने हवेत उडताना घेतलेला एक शानदार झेल. टीम इंडियासाठी विकेट मिळवून ती सुपरवुमन बनली.
𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗖𝗔𝗧𝗖𝗛!! 🤯
Radha Yadav takes a stunning catch to dismiss Amy Jones and fuel India’s winning chase! 🌟
Watch #ENGWvINDW 5️⃣th T20I Highlights on #SonyLIV 📲 pic.twitter.com/sQk6L1ib6a
— Sony LIV (@SonyLIV) July 12, 2025
राधा यादव ही भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. तिने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हे सिद्ध केले. अरुंधती रेड्डी २० व्या षटकात गोलंदाजी करत होती. दरम्यान, ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर इंग्लिश फलंदाज एमी जोन्सने एक शॉट मारला आणि तो हवेत गेला यावेळी राधा यादवने केलेली कामगिरी कौतुकास्पद होती. राधा यादवने डायव्ह केला आणि एक शानदार झेल घेतला. सहसा असे झेल उतरताना चुकतात पण राधाने चेंडू धरला. आता हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना एजबॅस्टन येथे खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करत १६७ धावा केल्या. दरम्यान, शेफाली वर्माने तिच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत ७५ धावा केल्या. इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी १६८ धावांची आवश्यकता होती. सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला आणि राधा यादवने झेल टिपून संघाला गती देण्याचा प्रयत्न केला. सामना अशा परिस्थितीत पोहोचला होता जिथे एका चेंडूत एक धाव आवश्यक होती. सोफी एक्लेस्टोन धाव घेण्यात यशस्वी झाली आणि इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवला.
भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये ५ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात आली. पहिले दोन सामने भारताने जिंकले. तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आणि चौथा सामना टीम इंडियाने जिंकला. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने वर्चस्व गाजवले. यामुळे मालिका ३-२ अशी बरोबरीत सुटली आणि भारताने इंग्लंडमध्ये पहिली टी२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली.