IND vs ENG: Test series ended in a draw, now he scored a century in England; 'This' Indian player has dominated the field..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. लीड्स येथे २० जूनपासून पहिला सामना खेळवला जाता आहे. या सामन्यात टीम इंडियाकडून एकूण ५ शतके झळकावली आहेत. त्याच वेळी, आता आणखी एका भारतीय फलंदाजाची भर पडली आहे. इंग्लंडमध्ये तिलक वर्माने शतक ठोकले आहे. वर्मा हा कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग नाही. या तिलक वर्माने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये हा पराक्रम करून दाखवला आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, तिलक वर्माने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात ही खेळी साकारली आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये, भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार तिलक वर्माने त्याच्या पादर्पणाच्या सामन्यात शानदार शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हॅम्पशायरकडून खेळताना, तिलकने एसेक्सविरुद्धच्या पदार्पणाच्या डावात शतक लगावले आहे. २२ वर्षीय वर्माने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी इंग्लंडला पोहोचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावून सर्वांना प्रभावित केले आहे.
तिलक वर्माने अतिशय महत्वाच्या वेळी शतकी खेळी खेळली. जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या संघानए आपल्या २ विकेट ३४ धावांतच गामावल्या होत्या. त्यानंतर तिलक वर्माने त्याच्या संघाचा डाव सावरत त्याने मोठे फटके देखील खेळले. त्याने १०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी २३९ चेंडू खर्च केले आहे. या दरम्यान, तिलकने ११ चौकार आणि ३ षटकार लागवले आहेत.
हेही वाचा : IND vs ENG : लीड्समध्ये शतकी तडाखा, तरी शतकवीर KL RAHUL ने व्यक्त केली खंत; केला मोठा खुलासा..
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये तिलक वर्मा खेळत असून हे भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक असणार आहे. काउंटी क्रिकेट हे नेहमीच फलंदाज आणि गोलंदाजांसाठी एक अवघड आव्हान मानले जाते. जिथे फलंदाजांना स्विंग आणि सीम हालचालींमुळे त्यांचे तंत्र आणखी सुधारण्यास मदत होते. हा अनुभव तिलकसाठी खूप महत्त्वाचा ठरू असणार आहे. यामुळे त्याला त्याची फलंदाजी सुधारण्याची संधी मिळेल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळण्याची तयारी करण्यास देखील महत्वाची असणार आहे.