केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. आज म्हणजे २४ जुलै लीड्स कसोटीत निर्णायक ठरणार आहे. इंग्लंडला आता चौथ्या डावात विजयासाठी २९५ धावांची आवश्यकता आहे. जॅक क्रॉली २६ धावा आणि बेन डकेट ४४ धावांवर खेळत आहेत. त्यांच्याकडे सर्व १० गडी बाद होण्याचे बाकी आहेत. तर दुसरीकडे, भारतीय संघाला जिंकण्यासाठी १० विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. जर आपण भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोललो तर फलंदाजीमध्ये भारताने चांगली कामगिरी केलीय आहे. यशस्वी, शुभमन आणि ऋषभ पंत यांच्यानंतर केएल राहुलने दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दुसऱ्या डावात १३७ धावांची खेळी केली आहे.
केएल राहुलने पहिल्या डावात ४२ आणि दुसऱ्या डावात १३७ धावा केल्या आहेत. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताला इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत. पण त्याच्या शानदार खेळीनंतर देखील तो दुःखी असल्याचे दिसून आले आहे. यामागील नेमके कारण काय आहे ते जाणून घेऊया?
हेही वाचा : IND Vs ENG : ‘विश्वास ठेवणार नसाल तर का खेळवायचे..?’, दिनेश कार्तिकचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला..
केएल राहुलच्या दृष्टिकोनातून २०२५ हे वर्ष पाहिले तर ते त्याच्यासाठी चांगले जात आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये देखील चांगल्या धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याची बॅट आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगलीच तळपत आहे. त्याने स्काय स्पोर्ट्सशी त्याच्या फलंदाजीबद्दल माहिती दिली.
स्काय स्पोर्ट्सशी बोलताना केएल राहुल म्हणाला की, “मी आता फक्त धावा काढत आहे. एक वेळ अशी होती की, मी सुरुवात करायचो पण त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकत नसायचो. विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये. मी पूर्वीपेक्षा आता जास्त शांत राहू लागलो आहे आणि आता मी आकड्यांमागे धावत नाही. मी माझ्या क्रिकेटचा शक्य तितका आनंद घेत आहे.”
केएल राहुल हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात स्टायलिश शैलीचा फलंदाज मानला जातो. त्याने टीम इंडियासाठी ५९ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याची सरासरी कमी म्हणजे ३५ च्या खालीच राहिली आहे. या गोष्टीमुळे या आशादायक खेळाडूवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘विश्वास ठेवणार नसाल तर का खेळवायचे..?’, दिनेश कार्तिकचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला..
केएल राहुलला त्याच्या कसोटी सरासरीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने उत्तर दिले की, “नक्कीच, जेव्हा मी माझ्या सरासरीकडे बघतो, तेव्हा ते दुखवणारे आहे. परंतु, सध्या मला आकड्यांबद्दल विचार करायचा नाही. जेव्हा जेव्हा मला संधी मिळत असते तेव्हा मी प्रभाव पाडू इच्छितो आणि भारतासाठी कसोटी खेळून आनंद घेऊ इच्छितो. ही गोष्ट मला लहानपणापासूनच आवडत आली आहे.”