फोटो सौजन्य : X
इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ : विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर संघामध्ये कोणते बदल होणार त्याचबरोबर टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. आता लवकरच क्रिकेट चाहत्यांचे सर्वच प्रश्न सुटणार आहेत. भारतीय क्रिकेट चाहते हे इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कर्णधार कोण असणार त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यासाठी कोणते खेळाडू असणार त्यासाठी फार उत्सुक आहेत. टीम इंडियाचे त्याचबरोबर परदेशी खेळाडू हे सध्या आयपीएल खेळण्यांमध्ये व्यस्त आहेत भारताचा अ संघ हा 30 मे पासून कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे. त्याचबरोबर भारताचा मुख्य संघ हा 20 जून पासून इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
RCB vs SRH : बंगळुरु पहिल्या स्थानासाठी लढणार! जितेश शर्माने नाणेफेक जिंकुन करणार गोलंदाजी
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या संघाचा कर्णधार कोण असणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे पण यावर लवकरच आता खुलासा होणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघामध्ये कोण कोणते खेळाडू असणार हे पाहणे देखील मनोरंजक ठरणार आहे. स्टार स्पोर्ट्सने एक पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये भारतीय संघाची घोषणा ही 24 मे रोजी शनिवारी दुपारी १२.३० वाजता केली जाणार आहे. यामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल यामध्ये शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह या दोघांना मुख्य दावेदार मानले जात आहे.
भारतीय संघाची इंग्लंड विरुद्ध होणारा टेस्ट मालिकेसाठी घोषणा ही स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदी या दोन्ही चॅनेलवर हिंदी कॉमेंट्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर इंग्लिश कॉमेंट्री मध्ये तुम्हाला स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 2 येथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जिओ हॉटस्टारवर तुम्हाला याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही मोफत पाहायला मिळणार आहे.
INDIAN SQUAD ANNOUNCEMENT LIVE ON STAR SPORTS TOMORROW. 🇮🇳 pic.twitter.com/PJYBWHFr82
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2025