फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे अपडेट : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे या मालिकेला सुरुवात ही 20 जून पासून होणार आहे. भारताचा संघ शुभमन गिल यांच्या नेतृत्वात ही मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा ने मागील महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता भारतीय कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिल याची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे आता कसोटी संघामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा कोण घेणार यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सध्या भारताच्या अ संघाची मालिका सुरु आहे, यामध्ये पहिल्या सामन्यात भारताच्या संघासाठी यशस्वी जयस्वाल याने ओपनिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केएल राहूल संघामध्ये सामील झाला होता. त्याने या सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणुन फलंदाजी केली आणि शतक झळकावले होते. अभिमन्यु ईश्वरन याने पहिल्या सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणुन मैदानात उतरला होता तर दुसऱ्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर आला होता.
इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली. अशा परिस्थितीत, आता प्रश्न असा आहे की त्याच्या जागी भारतासाठी सलामीवीराची भूमिका कोण बजावेल? रोहितच्या जागी ३ फलंदाज आहेत, जे त्याची जागा घेऊ शकतात. यादीत पहिले नाव केएल राहुलचे आहे. त्याने अनेक वेळा टीम इंडियासाठी कसोटीत सलामीवीराची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत तो एक प्रबळ दावेदार आहे.
याशिवाय, अभिमन्यू ईश्वरनकडे रोहित शर्माच्या जागी देखील पाहिले जात आहे. त्याच वेळी, आयपीएल २०२५ मध्ये पर्पल कॅप जिंकणाऱ्या साई सुदर्शनलाही सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालबद्दल बोलायचे झाले तर, तो रोहित शर्मासोबत आधीच कसोटीत सलामीवीर होता. अशा परिस्थितीत, त्याचे स्थान निश्चित मानले जात आहे.
Arjun Erigaisi ने Magnus Carlsen ला केलं चेकमेट! सामन्यात पराभव पण स्पर्धेत मिळवला विजय
भारताचा संघ काल म्हणजेच ६ जून रोजी इंग्लड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे, त्यामध्ये आता भारताच्या संघाची इंग्लड दौऱ्यावर संपुर्ण नवीन भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी भारताचे खेळाडु कशी कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.