IND vs ENG 4th Test: Yashasvi Jaiswal creates history! After 51 years, he did this Bhim feat in Manchester
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर जोडी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. परंतु, केएल राहुल ४६ धावा करून माघारी परतला. तर यशस्वी जैयस्वाल ५८ धावा करून बाद झाला. तत्पूर्वी या दरम्यान यशस्वी जयस्वालने एक भीम पराक्रम केला आहे.
अँडरसन-तेंडुलकर मालिकेच्या चौथ्या सामन्यात यशस्वी जयस्वालने अर्धशतक झळकावताच आणखी एक कामगिरी केली. १९७४ नंतर मँचेस्टरमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला सलामीवीर बनला आहे. १९७४ पासून या मैदानावर कोणत्याही सलामीवीराला अर्धशतक झळकावता आले नाही.
१९७४ मध्ये भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावस्करने ही कामगिरी करून दाखवली आहे. महान फलंदाज सुनील गावस्कर हा या मैदानावर अर्धशतकापेक्षा जास्त धावा करणारे शेवटचे भारतीय सलामीवीर ठरले होते. त्यांनी २५१ चेंडूत १०१ धावा केल्या आणि पहिल्या डावात इंग्लंडच्या ९/३२८ धावांच्या उत्तरात भारतीय संघाने २४६ धावा केल्या होत्या. गावस्कर यांनी दुसऱ्या डावातही आपले वर्चस्व कायम राखत १४० चेंडूत ५८ धावांची लढाऊ खेळी केली होती, परंतु तरी देखील भारताला ११३ धावांचा पराभव टाळता आला नव्हता.
हेही वाचा : IND vs ENG 4th Test : Yashasvi Jaiswal चा नवा कारनामा! इंग्लंडविरुद्ध फाटकावल्या सर्वात जलद १ हजार धावा
यशस्वी जयस्वालने या सामन्यात अर्धशतक झळकावताच मोठी विक्रमी कामगिरी केली आहे. भारत या मैदानावर एका दशकानंतर सामना खेळत आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दशकांत भारताने मँचेस्टरमध्ये फक्त २ कसोटी सामने खेळलेले आहेत. १९९० मध्ये सचिन तेंडुलकरने या मैदानावर दुसऱ्या डावात पहिले कसोटी शतक साकारले होते. त्यावेळी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने पहिल्या डावात १७९ धावा फाटकावल्या होत्या. ज्यामुळे सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले होते. तेव्हापासून ओल्ड ट्रॅफर्डवर कोणत्याही भारतीय फलंदाजाने शतक झळकावलेले नाही.
२०१४ मध्ये, मँचेस्टरमध्ये कसोटी सामना खेळताना, भारताला डावाच्या पराभव पत्करावा लागला होता. भारताकडून एमएस धोनी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने दुसऱ्या डावात १३३ चेंडूत ७१ धावा फटकावल्या होत्या. सर्व डावांमध्ये ६ फलंदाज खाते न उघडता बाद झाले होते. त्यानंतर, २०२५ मध्ये याच मैदानावर सामना होत आहे. यशस्वी जयस्वालने या सामन्यात ५८ धावांची खेळी खेळली, त्यानंतर त्याला माघारी जावे लागले.