IND vs ENG: Yashasvi Jaiswal creates history in Leeds; Scores century against Saheb, becomes first Indian player to do so..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल भारताच्या डावाची सुरवात केली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची मोठी भागीदारी रचली. परंतु, राहुल ४२ धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला साई सुदर्शन स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी सामान्याचे सूत्रे हाती घेतली. यशस्वी जैस्वालने या सामन्यात शतक झाळकावून इतिहास रचला आहे.
भारतीय संघासाठी सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी हेडिंग्ले येथे शानदार फलंदाजी केली. या सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी रचली. केएल राहुल आणि साई सुदर्शनच्या विकेट गमावल्यावर शुभमनच्या साथीने जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांचे पिसं काढली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणताची संधी दिली नाही. या दरम्यान यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून विक्रम रचला आहे. यशस्वी जयस्वाल हा इंग्लंडमध्ये शतक साकारणारा पहिला डावखुरा फलंदाज ठरला आहे. याआधी कुणाही भारतीय फलंदाजाला हा विक्रम करता आलेला नाही. यशस्वी जयस्वालने १५४ चेंडूचा सामना करत १०० धावा केल्या. त्याने या खेळीत १६ चौकार आणि १ षटकार लगावला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन आऊट झाल्यावर मैदानात चौथ्या स्थानावर खेळायला भारतीय संघाचा नवीन कर्णधार शुभमन गिल मैदानात आला. त्याने आपल्या खेळाची सुरवात आक्रमकच केली. शुभमनने आपल्या कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पहिले अर्धशतक ठोकले आहे. शुभमन गिलेने ७४ चेंडूचा सामना करत ५८ धावा केल्या आहेत. टी ब्रेकपर्यंत भारताच्या दोन गड्यांच्या बदल्यात २१५ धावा झाल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १०० तर शुभमन गिल ५८ धावांवर खेळतआहेत.
📸 📸
A celebratory run 👌
The hands aloft 🙌
The trademark jump ☺️
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @ybj_19 pic.twitter.com/E4PDGDOKEb
— BCCI (@BCCI) June 20, 2025
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.