फोटो सौजन्य – X
हॅरी ब्रुक – शुभमन गिल व्हिडीओ : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये मागील दोन जणांमध्ये भारताच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने पहिल्याच डावामध्ये 587 धावा केल्या आहेत. कालच्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने द्विशतक झळकावले त्याने संघासाठी 269 धावा केल्या. त्याचे 31 धावांनी त्रिशतक हुकले. स्टार स्पोर्ट्स बऱ्याचदा स्टंप माईकमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यामध्ये बऱ्याचदा दोन्ही संघांमधील खेळाडूंचे संभाषण पाहायला मिळते.
आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामध्ये इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक हा शुभमन गिलशी संभाषण साधताना दिसत आहे. यामध्ये आता सोशल मीडियावर हरी ग्रुप शुभमन गिलशी माईंड गेम खेळत आहे असेच म्हटले जात आहे. चहापानानंतर इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरचा षटक सुरू होता. तो भारतीय डावातील १४३ वा षटक होता. २६५ धावा काढल्यानंतर गिल खेळत होता. त्यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हॅरी ब्रूकने त्याची एकाग्रता भंग करण्यासाठी एक युक्ती खेळली. तो गिलला काहीतरी बोलताना दिसला आणि भारतीय कर्णधार त्याला उत्तर देतानाही दिसला. याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप समोर आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्यावेळी इंग्लंडचे माजी कर्णधार माइक आथर्टन कॉमेंट्री करत होते. कॉमेंट्री करताना त्यांनी ब्रुक आणि गिलमध्ये काय चालले आहे ते सांगितले. ब्रुक म्हणाला, ‘२९० धावा ओलांडणे खूप कठीण आहे.’ यावर गिलने विचारले की तुम्ही किती त्रिशतके केली आहेत. कदाचित याच दरम्यान गिलची एकाग्रता भंग झाली असेल आणि इंग्रजांना हेच हवे होते. बशीरचा ओव्हर संपली आणि टंगच्या पुढच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर, म्हणजेच भारतीय डावाच्या १४४ व्या ओव्हरवर, शुभमन गिल २६९ धावा करून बाद झाला. तसे, ब्रुकचे कसोटीत त्रिशतक आहे.
— The Game Changer (@TheGame_26) July 3, 2025
गिलने त्याच्या २६९ धावांच्या ऐतिहासिक खेळीदरम्यान ३८७ चेंडूंचा सामना केला. या दरम्यान त्याने ३० चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ५८७ धावांचा मोठा स्कोअर केला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने ७७ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. शुक्रवारी एजबॅस्टन कसोटीचा तिसरा दिवस आहे आणि इंग्लंड अजूनही ५१० धावांनी पिछाडीवर आहे.