Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NED : तिलकही झाला चकीत! ४१ वर्षीय व्हॅन डेर मेर्वेनेचा जादुई अवतार;  हवेत सुर मारून पकडला सर्वोत्तम झेल; पहा VIDEO

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ वा सामना भारत  आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १९३ धावा केल्या आहेत. या सामन्यात एक शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 18, 2026 | 09:58 PM
IND vs NED: Tilak was also surprised! 41-year-old Van der Merwe's magical avatar; He took the best catch by hitting the ball in the air; Watch VIDEO

IND vs NED: Tilak was also surprised! 41-year-old Van der Merwe's magical avatar; He took the best catch by hitting the ball in the air; Watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NED, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ वा सामना भारत  आणि नेदरलँड्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात असून  या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या आहेत. या दरम्यान, नेदरलँड्सचा अनुभवी अष्टपैलू रोएलॉफ व्हॅन डेर मेर्वे पुन्हा एकदा त्याच्या चपळाई आणि फिटनेससाठी चांगलाच चर्चेत आहे. ४१ वर्षीय मेर्वेने जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये देखील भाग घेतला आहे आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी तो प्रसिद्ध आहे. व्हॅन डेर मेर्वेने भारताविरुद्ध हवेत सुर मारून झेल घेतला आहे.

हेही वाचा : PAK vs NAM, T20 World Cup : पाकिस्तानची एक्सप्रेस सुपर 8 मध्ये दाखल! टी-20 विश्वचषकात नामिबियाला 102 धावांनी चारली धूळ

सीमारेषेवर मारला हवेत सुर

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात मेर्वेने त्याच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांना आश्चर्यचकीत केले.  भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी डावाच्या नवव्या षटकाचा शेवटचा चेंडू लॉन्ग ऑफच्या दिशेने खेळला. तो चेंडू सीमारेषेकडे जात असताना तिथेच उभा असलेला मेरवे लगेच उजवीकडे धाव घेत हवेत उडी मारत दोन्ही हातांनी एक शानदार झेल टिपला. या शानदार प्रयत्नाने तिलक वर्माची पारी समाप्त झाली. व्हॅन डेर मेर्वेच्या झेलची मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चांगलीच वाह वाह केली.

Undoubtedly, the Greatest ever catch by 41-year-old Roelof van der Merwe in T20 World Cup. pic.twitter.com/3YqgqGROY4 — World Monitor (@MonitorWarnow) February 18, 2026

तिलक वर्माला भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज मानले जात असून त्याने या(टी-२० विश्वचषक २०२६ )स्पर्धेत चांगली सुरुवात केली, परंतु त्याला त्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत रूपांतर करतया आले नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने २७ चेंडूत ३१ धावा फटकावल्या. याआधी त्याने पाकिस्तानविरुद्ध २४ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. त्याने नामिबियाविरुद्ध २१ चेंडूत २५ धावा केल्या आणि अमेरिकेविरुद्ध १६ चेंडूत २५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा : IND vs NED, T20 World Cup : शिवम दुबेने राखली लाज! भारताचे नेदरलँड्ससमोर 194 धावांचे लक्ष्य; लोगन व्हॅन बीक चमकला

नेदरलँड्ससमोर भारताचे १९३ धावांचे लक्ष्य

२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील ३६ व्या सामन्यात, भारताने नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९३ धावा उभ्या केल्या. भारतीय संघाकडून शिवम दुबेने शानदार फलंदाजी करत सर्वाधिक ६६ धावांची खेळी. त्याच्या जलद खेळीने संघाला मजबूत धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नेदरलँड्सकडून बीक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

Web Title: Ind vs ned t20 world cup 41 year old van der merwe takes a magical catch off tilak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.