
IND vs NZ: KL Rahul shatters MS Dhoni's record! Achieves 'this' feat after scoring a century against New Zealand in Rajkot.
KL Rahul broke MS Dhoni’s record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने शतक झळकवले आहे. या शतकासह त्याने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक करणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे. त्याने माजी यष्टीरक्षक-कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा : IND vs NZ 2nd ODI : KL Rahul ने केला भीम पराक्रम! ODI मध्ये 2025 नंतर अशी करणारा तो जगातील पहिला फलंदाज…
राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, केएल राहुलने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. शतक करणारा तो पहिला यष्टीरक्षक-फलंदाज ठरल्या बरोबरच राजकोटमध्ये एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ४९ व्या षटकात काइल जेमीसनच्या पूर्ण नाणेफेकीवर षटकार मारून राहुलने आपले आठवे एकदिवसीय शतकाला गवसणी घातली आहे. कर्नाटकच्या यष्टीरक्षक-फलंदाजाने केवळ ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्ध त्याने ९२ चेंडूत नाबाद ११२ धावा केल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि एक षटकार लगावले.
राहुलने डावाची सूत्रे हातात घेऊन रवींद्र जडेजासोबत ७३ धावांची महत्त्वाची भागीदारी केली, ज्यामुळे भारतीय डाव स्थिर होण्यास मदत झाली. जडेजा २७ धावा कडून बाद झाला. पण राहुल मैदानावर टिकून राहिला आणि त्याने नितीश कुमार रेड्डीसोबत डाव सावरला आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्यात मोठी भूमिका बजावली. राहुलच्या फलंदाजीमुळे भारतीय संघाने ५० षटकांत ७ बाद २८४ धावा उभ्या केल्या.
केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध १० डावात ९३.८ च्या सरासरीने ४६९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.