KL Rahul ने केला भीम पराक्रम(फोटो-सोशल मीडिया )
KL Rahul sets a record in One Day Internationals : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून २८४ धावा उभ्या केल्या आहेत. या कामगिरीसह केएल राहुलने एक मोठा पराक्रम केला आहे.
२०२५ पासून, केएल राहुल ४१ ते ५० षटकांत एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. केएल राहुलने आतापर्यंत पूर्ण-सदस्यीय संघांमध्ये १४०.०९ च्या स्ट्राइक रेटने २८३ धावा काढल्या आहेत. अलिकडच्या काळात केएल राहुल भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका निभावताना दिसस्त आहे. केएल राहुलने गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. गेल्या चार सामन्यांमध्ये केएल राहुलने ६०, ६६, २९ आणि ११२ धावा केल्या असून या कामगिरीतून त्याने आपली क्षमता दकाहवून दिली आहे. या दरम्यान केएल राहुल तीन वेळा नाबाद राहिला आहे.
शुभमन गिलने ५३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांसह ५६ धावा काढून माघारी गेला. तर कोहलीने २३ धावां काढून बाद झाला. भारताने ११८ धावांच्या अंतरावर ४ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, केएल राहुलने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी ८८ चेंडूत ७३ धावा जोडत संघाची धावसंख्या १९१ पर्यंत नेऊन ठेवली. जडेजा २७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर, केएल राहुलने नितीश रेड्डी (२०) सोबत सहाव्या विकेटसाठी ५७ धावा जोडत भारताची धावसंख्या २४८ पर्यंत पोहचवली. न्यूझीलंडकडून ख्रिश्चन क्लार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले, तर काइल जेमिसन, जॅक फॉल्क्स, जेडेन लेनोक्स आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.






