
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताच्या संघाची न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे, या मालिकेचा पहिला सामन्याचा चौथा दिवस सुरु आहे. भारताच्या संघाने केलेल्या पहिल्या इनिंगमधील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार कमबॅक केला आहे. दुसऱ्या इनिंगचा शुभारंभ होताच भारताच्या संघाने सामन्यावर कब्जा केला आहे. सुरुवातीपासूनच भारताच्या संघाने दुसऱ्या इनिंगमध्ये धावांचा मारा करायला सुरुवात केली आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माने कमालीची कामगिरी करत अर्धशतक ठोकत भारताच्या संघाला मजबूत केले. रोहित शर्माने ६३ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने सुद्धा संघासाठी ३५ धावांची खेळी खेळली. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या बॅटमधून सुद्धा धावा आल्या आहेत. विराट कोहलीने १०२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या आहेत.
सध्या मैदानावर भारताचा फलंदाज सरफराज खान आणि रिषभ पंत टिकून आहेत. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्याच सेक्शनमध्ये चौथ्या दिनाच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या फलंदाजांचा घाम गाळला आहे. पहिले सरफराज खानने शतक केले. आता ऋषभ पंतने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. पंतने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाने ७१ षटकात ३४४/३ धावा केल्या आहेत. आता टीम इंडिया केवळ १२ धावांनी मागे आहे. सर्फराज १२५ आणि पंत ५३ धावांवर खेळत आहेत. ७१ षटकांचा खेळ संपल्यानंतर पावसामुळे सामना थांबला.
12th Test FIFTY for Rishabh Pant! 👌 👌 This has been an entertaining knock 👏 👏 Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ipZSWtZjUk — BCCI (@BCCI) October 19, 2024
भारताचा संघ सध्या पहिल्या सेशननंतर १२ धावा दूर आहे. भारताच्या संघाने कमालीचा कमबॅक करत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला आहे. पहिल्या सेशनच्या काही काळाआधीच पावसाने हजारी लावल्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. त्यामुळे भारताचा संघ किती धावांचे लक्ष्य उभे करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सरफराज खानने त्याच्या करियरचे पहिले अर्धशतक ठोकले आहे आणि अजूनही तो मैदानावर टिकून आहे. या शतकाच्या माध्यमातून त्याने टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. सरफराजने ११० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. अजून फलंदाजीसाठी भारतीय संघाकडे केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवींचंद्रन अश्विन या फलंदाजांची पर्याय शिल्लक आहेत. रिषभ पंतला किपींग करताना जडेजा गोलंदाजी करत असताना त्यांना गुडघ्यांना दुखापत झाली होती. दीड दिवसांमध्ये रिकव्हर होऊन अर्धशतक नावावर केले आहे.