
IND vs NZ ODI Series: First, he wreaked havoc on the field with the bat! Later, Virat Kohli struck an emotional chord while talking about his mother; winning the hearts of the fans...
Virat Kohli’s emotional statement about his mother : काल वडोदरा येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३०१ धावांचे आव्हान दिले होते. प्रतिउत्तरात विराट कोहलीच्या ९३ धावांच्या जोरावर भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि भारताने हा सामना ४ विकेट्सने आपल्या खिशात टाकला. विराट कोहलीच्या विजयी खेळीने त्याला “प्लेअर ऑफ द मॅच” च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, त्याने आपल्या आईबद्दल भावनिक विधान केले आहे.
हेही वाचा : …म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा
भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या आईबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने स्पष्ट केले की तो त्याच्या पुरस्कारांचा हिशोब ठेवत नाही, परंतु तो गुडगावमधील त्याच्या आईला पाठवत असतो. कारण त्याची आई या कामगिरीला सांभाळून ठेवते. त्याच्या क्रिकेट प्रवासाची आठवण करून देताना, कोहलीने हे “स्वप्न सत्यात उतरले” असे वर्णन केले असून म्हटले की त्याला नेहमीच त्याच्या क्षमतेवर विश्वास राहिला आहे.
विराट कोहलीने कबूल केले की तो आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने कठोर परिश्रम केले असून देवाने त्याला कल्पना केली त्यापेक्षा जास्तच दिले आहे. विराट कोहलीने स्वतःबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला आहे.
सामन्याच्या रणनीती आणि विक्रमांबद्दल चर्चा करताना कोहली म्हटलं की, तो मैदानावरील टप्पे किंवा विक्रमांबद्दल विचार करत नाही. त्याचे लक्ष्य नेहमीच संघाचा विजय सुनिश्चित करणे राहिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचा मंत्र हा प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणणे हा असतो. क्रीजवर आल्यानंतर त्याला जाणवले की किवी गोलंदाजांवर दबाव येऊ शकतो आणि त्याने तेच करण्याचा प्रयत्न एकला. त्याने असे देखील म्हटले की जर संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला असता तर त्याची खेळण्याची शैली आणखी आक्रमक राहिली असती.
विराट कोहलीने खेळाबद्दलची त्याची आवड मानवी भावनांशी जोडली आहे. त्याने महतेल आहे की, मैदानावर चढ-उतार येतात आणि संघासाठी परिस्थिती देखील बदलत राहते. या क्रिकेट खेळाद्वारे लाखो लोकांना आनंद देण्यात त्याचे सर्वात मोठे समाधान आहे. त्याच्या समर्पणाने आणि उत्कटतेने हे सिद्ध करून दाखवले आहे की. तसेच, त्याच्यामते, वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाचे विजय आणि खेळावरील प्रेम त्याला अधिक महत्त्वाचे आहे.