फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिला सामना एकतर्फी जिंकला. हा भारताचा यूएईविरुद्ध झाला आहे, तर पाकिस्तानचा पहिला सामना हा यूएईविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना झाल्यानंतर दोन्ही संघ हे एकमेकांविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामना सध्या वादाचे कारण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा शानदार सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
या सामन्यापूर्वी पाकिस्तानला ओमानसोबत एक सामना खेळायचा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी, पाकिस्तानी प्रशिक्षक माइक हेसन यांनी त्यांच्या फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले आणि एका गोलंदाजाला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हटले. पत्रकार परिषदेत पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल विचारण्यात आले की हा सामना फिरकी गोलंदाजांमध्ये होईल का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “आमच्या संघाचे सौंदर्य म्हणजे आमच्याकडे ५ फिरकी गोलंदाज आहेत आणि जेव्हा तुमच्याकडे असे फिरकी गोलंदाज असतात तेव्हा खेळपट्टीलाही काही फरक पडत नाही.
सध्या आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाज मोहम्मद नवाज आहे. आमच्याकडे अबरार आणि सुफियान देखील आहेत आणि सॅम अयुब सध्या टॉप-१० अष्टपैलू खेळाडूंमध्ये आहे.” तो पुढे म्हणाला, “आमच्याकडे सलमान आगा आहे जो एक चांगला कसोटी फिरकी गोलंदाज आहे. जर परिस्थिती अनुकूल असेल तर आमच्याकडे फिरकी गोलंदाजीसाठी अनेक पर्याय आहेत. आमच्याकडे ५ जलद गोलंदाज देखील आहेत. आता किती फिरकी गोलंदाजांना संधी मिळेल हे खेळपट्टी कशी आहे यावर अवलंबून असेल.”
आशिया कप २०२५ च्या आधी, पाकिस्तानने टी-२० तिरंगी मालिका खेळली, जी पाकिस्तानने जिंकली. तिरंगी मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना त्याने अफगाणिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन त्याचे कौतुक करताना दिसले.
Bigg Boss 19 : अमाल मलिकचा दावा, आवेज दरबार नगमाला फसवतोय, दररोज कोणाला ना कोणाला फोन…
पाकिस्तान संघ आजपासून आशिया कप २०२५ मोहिमेला सुरुवात करणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता पाकिस्तानचा सामना भारताशी होईल. आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांशी भिडताना दिसतील. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दमदार मिळवलेल्या विजयानंतर आता भारताचा संघ सुपर 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी एक विजय दूर आहे.