IND vs PAK: PCB Chairman Mohsin Naqvi goes beyond reform! Will return Asia Cup trophy, but imposes 'this' condition
IND VS PAK Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) चा अंतिम सामना रविवारी, २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेती ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन गेले. नक्वी यांच्या कृतीवर टीका देखील झाली. दरम्यान, मोहसिन नक्वी यांनी आता भारताला ट्रॉफी देण्यास सहमती दर्शविली असली तरी त्यासोबत एक अट घातली आहे. ते म्हणले की, समारंभ आयोजित करण्यात आला तरच ते भारतीय संघाला ट्रॉफी प्रदान करतील आणि ते वैयक्तिकरित्या संघाच्या खेळाडूंना ट्रॉफी आणि पदके देखील देतील.
हेही वाचा : IND VS PAK : ‘बस झाली आता नाटकं! ACC च्या बैठकीत मोहसिन नक्वी यांच्यावर BCCI कडून होणार कारवाईची मागणी…
क्रिकबझच्या वृत्तानुसार, एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतीय संघाला ट्रॉफी सादर करण्यास तयार झाले आहेत. परंतु, त्यांनी त्यासाठी एक अट घातली आहे. नक्वी यांच्याकडून भारतीय संघाच्या खेळाडूंना वैयक्तिकरित्या पदके देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांना यासाठी ‘औपचारिक समारंभ’ आयोजित करावा लागणार असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच ते म्हणाले की, ” मी संभारंभात वैयक्तिकरित्या भारतीय खेळाडूंना पदके आणि ट्रॉफी सोपवावी.” तथापि, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव बघता अशी व्यवस्था करण्यात येण्याची आणि नक्वी यांची अट मान्य करण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नक्वी यांच्या हॉटेलच्या खोलीत ट्रॉफी आणि पदके घेऊन जाण्याच्या कृतीवर निशाणा साधला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे की, “आम्ही एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्याचा निर्णय घेतला नाही, जे पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. म्हणून, आम्ही त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही.”
हेही वाचा : IND W vs SL W : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुणाचा वरचष्मा? पहा रेकॉर्ड
त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिल आहे की, बीसीसीआयने या प्रकरणाची तक्रार आयसीसीकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पुढे असे देखील म्हटले की, “याचा अर्थ असा नाही की तो पदकांसह ट्रॉफी घेऊन जाईल. हे खूप दुर्दैवी आणि खेळभावनेचा अपमान करणारे आहे.”