बीसीसीआय आणि मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
अंतिम सामन्यानंतर, सुमारे दीड तास मैदानावर वादग्रस्त घटना घडत राहिल्या. एसीसी अध्यक्ष नक्वी यांच्याकडून विजेत्या संघाला ट्रॉफी आणि पदके सादर करण्याचा आग्रह धरण्यात आला, तर भारतीय खेळाडू देखील नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याच्या निर्णयावर ठाम राहिले. लाजिरवाणेपणा पाहून नक्वी ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन गेले. त्यानंतर भारतीय संघ ट्रॉफीशिवाय आपल्या मायदेशी परतला. मुंबई येथे पोहोचल्यानंतर विमानतळावर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
ट्रॉफी त्यांच्यासोबत ठेवणे बेकायदेशीर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉफी दुबईतील एसीसी मुख्यालयामध्ये नाही. बीसीसीआयचा असा विश्वास आहे की ट्रॉफी त्यांच्याकडे ठेवणे बेकायदेशीर कृती आहे. म्हणूनच, बोर्डाकडून आज, मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी एसीसी सदस्यांसोबत होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुबईमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी २:०० वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता) या बैठकीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जुलैमध्ये ढाका येथे पुढे ढकलण्यात आलेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली होती.
बीसीसीआयकडून पुढील कारवाईसाठी रणनीती आखण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर बैठक नियोजित वेळेनुसार पार पडली. तर बीसीसीआयचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आणि भारतीय बोर्डाला ट्रॉफी सोपवण्याची औपचारिक विनंती करतील, जी भारताने रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला पराभूत करून जिंकली होती. जर मोहसिन नक्वी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही, तर भारत पुढील कारवाई करण्याची योजना तयार ठेवेल. या शिष्टमंडळात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला किंवा माजी कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश असणार आहे. शुक्ला हे एसीसी बोर्डावर बीसीसीआयचे कार्यकारी सदस्य असून शेलार हे बोर्डावर बीसीसीआयचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहत आहेत.
एसीसीच्या होणाऱ्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला किंवा माजी कोषाध्यक्ष आशिष शेलार करण्याची शक्यता आहे. राजीव शुक्ला हे एसीसी बोर्डावर बीसीसीआयचे कार्यकारी सदस्य आहेत, तर शेलार हे पदसिद्ध बोर्ड सदस्य म्हणून काम पाहतात.






