Ind vs Pak war, : Big update regarding the organization of IPL 2025! BCCI received an offer, this country took the initiative, will the matches be held outside India?
IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयकडून शुक्रवारी, ९ मे रोजी आयपीएल २०२५ बाबत मोठा निर्णय घेण्याताळ आहे. ही टी२० स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली. तथापि, आठवड्याभरानंतर आयपीएल पुन्हा सुरू होईल की नाही हे अद्याप निश्चित नाही. दरम्यान, बीसीसीआय आयपीएल देशाबाहेर आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अशा प्रकारचा प्रस्ताव समोर आला आहे.
वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२५ हंगाम भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलला आहे. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत, की जर लीग पुन्हा सुरू झाली तर ती कधी आणि कुठे आयोजित केली जाणार? याबाबत सतत चर्चा सुरू झालीय आहे. अशा वेळी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून स्पर्धेतील उर्वरित सामने त्यांच्या देशात आयोजित करण्यासाठी बीसीसीआयशी संपर्क साधण्यात आला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियात होणार मोठे बदल! कर्णधारपदासाठी ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा..
नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये ६-७ मे पासून सतत संघर्ष बघायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानला सूड उगवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावात कमालीची वाढ झाली आहे. हे पाहता, ८ मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना मध्यातच थांबवावा लागला होता. त्यानंतर ९ मे रोजी बीसीसीआयने ही स्पर्धा तात्काळ थांबवण्याचे जाहीर केले.
याबाबत माहिती देताना, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, सध्या आयपीएल फक्त एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. भारतीय मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले की, स्पर्धेबाबत पुढील कोणताही निर्णय केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असणार आहे. अशा वेळी, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला स्पर्धेतील उर्वरित सामने त्यांच्या देशात आयोजित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
इंग्लंडच्या ‘द क्रिकेटर’ मासिकाच्या मते, इंग्लंड बोर्डाकडून बीसीसीआयला प्रस्ताव देण्यात आला आहे की, आयपीएल २०२५ चे उर्वरित १६ सामने त्यांच्या देशात आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. अद्याप, सध्या भारतीय बोर्डाकडून याबाबत कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
ईसीबी व्यतिरिक्त, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी देखील ही शुक्रवारी हे सूचित केले होते. त्यांनी पोस्ट करून लिहिले होते की आयपीएलचा उर्वरित भाग इंग्लंडमध्ये पूर्ण करण्यात येऊ शकतो. खर तर इंग्लंड बोर्डाने बीसीसीआयला असा प्रस्ताव देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२१ च्या सुरुवातीला देखील, जेव्हा कोरोनामुळे आयपीएल हंगाम मध्यभागी थांबवावा लागला होता, तेव्हाही ईसीबीकडून बीसीसीआयला प्रस्ताव देण्यात आला होता की, ते उर्वरित सामने त्यांच्या देशात आयोजित करण्यास तयार आहेत.