टीम इंडिया(फोटो- सोशल मिडिया)
IND vs ENG : भारत-पाकिस्तान तणाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. त्याच्या कामकाजाबाबतचा निर्णय एका आठवड्यानंतर घेतला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. तसेच, भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा देखील करायचा आहे. या काळात संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामनेखेळणार आहे. या मालिकेला २० जूनपासून सुरवात होत आहे. याआधी २००७ मध्ये भारतीय संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंड कसोटी मालिका जिंकली होती.
अशा परिस्थितीत आता रोहित शर्माने मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या अनुपस्थितीत ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वी, भारतीय संघाला२०२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळवता आले नाही. म्हणूनच, इंग्लंडविरुद्धची ही पाच सामन्यांची कसोटी मालिका २०२५-२७ च्या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या चक्रात संघासाठी एक नवीन सुरुवात असणार आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला नवीन कर्णधाराची गरज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या भारतीय संघाच्या नवीन कर्णधारासाठी शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांच्यात स्पर्धा रंगली आहे. हे दोन्ही खेळाडू सद्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. यावेळी इंग्लंडविरुद्धच्या भारतीय संघात बी साई सुदर्शन, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद शमी हे खेळाडूंचा समावेश होऊ शकतो.
हेही वाचा : IPL 2025 Suspended : उर्वरित आयपीएलचे सामने होणार या देशात! वाचा संपूर्ण माहिती
इंग्लंड मालिकेत यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल संघाकडून डावाची सुरुवात करतील. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याच वेळी, केएल राहुलला यष्टीरक्षक म्हणून पसंती देण्यात येईल. तर डावखुरा फलंदाज बी. साई सुदर्शन देखील संघात जागा मिळवू शकतो. साई सुदर्शनने उत्तम कामगिरी करत आहे. याशिवाय, करुण नायरलाही संघात स्थान मिळू शकते अशी बातमी समोर आली आहे. हे उल्लेखनीय आहे की करुण नायरने इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतकही झळकावले आहे.