फोटो सौजन्य - IndianPremierLeague
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा ट्रेनचा प्रवास : २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना त्याचा जीव गमवावा लागला. त्यांनंतर भारताने ७ मे रोजी सिंदूर ऑपरेशन केले आणि यामध्ये दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उद्दवस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले. ८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन अटॅक आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तणाव वाढला आणि भारताने देखील प्रतित्युतर देण्यास सुरुवात केली. यावेळी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरु होता.
शुक्रवारी म्हणजेच ९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांना धर्मशाळेतून बाहेर काढण्यात आले. दोन्ही संघांना कडक सुरक्षेत होशियारपूर मार्गे जालंधर रेल्वे स्टेशनवर नेण्यात आले. ही माहिती कांगडा पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, ही पथके सध्या एका विशेष ट्रेनने नवी दिल्लीला रवाना होत आहेत. गुरुवारी म्हणजेच ७ मे रोजी चंदीगडजवळील एअरपोर्ट भागामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर लगेचच पंजाब आणि दिल्ली यांच्यातील आयपीएल सामना मध्यावरच रद्द करण्यात आला, ज्यामुळे भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले.
Thank you, @RailMinIndia, for arranging a special Vande Bharat train on such short notice to ferry the players, support staff, commentators, production crew members, and operations staff to New Delhi.
We deeply appreciate your swift response. 🙌🏽@AshwiniVaishnaw | @JayShah |… pic.twitter.com/tUwzc5nGWD
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
पीटीआयशी बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी सकाळी दोन्ही संघांच्या संपूर्ण पथकाला, ज्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि प्रसारण कर्मचारी यांचा समावेश होता, सुमारे ४० ते ५० लहान वाहनांमधून धर्मशाळाहून पंजाब सीमेवरील होशियारपूरला नेण्यात आले. त्यांनी सांगितले की, कांगडा पोलिसांनी ताफ्याला सुरक्षा पुरवली होती आणि वाहने होशियारपूरला पोहोचल्यानंतर पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था हाती घेतली. तिथून त्यांना जालंधरला खास व्यवस्था केलेल्या ट्रेनमध्ये नेण्यात आले.
IPL 2025 Suspended : उर्वरित आयपीएलचे सामने होणार या देशात! वाचा संपूर्ण माहिती
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० मिनिटांमध्ये धर्मशाला स्टेडियम रिकामे करण्यात आले होते. पुढे त्यांनी सांगितले की,तेथे असलेल्या सर्व खेळाडूंची आणि प्रेक्षकांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता होती. दोन्ही संघांच्या खेळाडूंना ताबडतोब मैदानातून परत बोलावण्यात आले आणि कडक सुरक्षेत त्यांच्या संबंधित हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्याचबरोबर आयपीएलचे अध्यक्ष स्वतः मैदानावर उतरून त्यांनी मैदानावर पाहायला आलेले सर्व प्रेक्षकांना स्टेडियम रिकामी करण्याची विनंती केली.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव सुरू झाला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. बीसीसीआयने म्हटले आहे की, जेव्हा देश दहशतवादी हल्ल्याला आणि सीमापारच्या अनावश्यक आक्रमणाला प्रतिसाद देत आहे, तेव्हा इतर बाबींपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले जाते.