
IND vs SA 1st Test : Jasprit Bumrah's historic maximum! This feat was done for the first time in 17 years
बूमराहच्या आधी, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेल स्टेनने ३ एप्रिल २००८ रोजी अहमदाबाद कसोटीत ८ षटकांत २३ धावा देत पाच विकेट्स घेण्याची किमया साधली होती. यासह, २२ नोव्हेंबर २०१९ रोजी कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटीत इशांत शर्माने १२ षटकांत २२ धावा देत पाच बळी घेतले होते. तसेच ऑक्टोबर २०२४ मध्ये बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झीलंडच्या मॅट हेन्रीने पाच भारतीय फलंदाजांना माघारी पाठवले होते.
जसप्रीत बुमराहचा कारकिर्दीतील हा १६ वा पाच बळी ठेला आहे. त्याच्या पुढे फक्त चार भारतीय गोलंदाज आहेत. रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आणि कपिल देव. या चार गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहपेक्षा जास्त पाच बळी टिपले आहेत.
हेही वाचा : IND vs SA 1st Test : कुलदीप यादवचा मोठा कारनाम! जडेजा-झहीर खानचा विक्रम मोडत क्रिकेटमध्ये रचला इतिहास
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक पाच बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. त्याच्या मागे फक्त डेल स्टेन (५ वेळा) आणि रविचंद्रन अश्विन (५ वेळा) आहेत. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये चार वेळा पाच बळी टिपले आहेत.