
IND vs SA 1st Test: 'Virat' performance on Shubman Gill's radar! He will be the first Indian captain to achieve 'this' feat after 93 years
IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून दोन समान्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिलला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळवला जाणार आहे. विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला आणखी एक आव्हान पेलावे लागणार आहे. येत्या पहिल्या कसोटीत अनेक पैलूंवर जाणकारांचे लक्ष असणार आहे. यामध्ये शुभमन गिलचे कर्णधारपद आणि फलंदाजी दोन्हीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. शुभमन गिलला एक खास विक्रम करण्याची संधी आहे. जर गिलने या दोन कसोटींपैकी एका कसोटीत देखील शतक झळकावले तर तो भारतीय कसोटी इतिहासाच्या ९३ वर्षांमध्ये ही कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार ठरणार आहे.
हेही वाचा : IPL 2026 चे सामने पुण्यात परण्याची शक्यता! MCA कडून RCB ला होम ग्राऊंडची दिली ऑफर
शुभमन गिल एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके झळकावण्याबाबत सांगितले तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी एकदा नाही तर दोन वेळा केली आहे. पहिल्यांदा २०१७ मध्ये आणि त्यानंतर पुढच्या २०१८ मध्ये केली आहे. कोहलीने दोन्ही वर्षांत पाच शतके झळकवली आहेत. तर शुभमन गिल २०२५ मध्ये पाच शतकांसह कोहलीशी बरोबरी साधली आहे. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोहलीच्या नावे जमा आहे. विराटला मागे टाकण्यासाठी गिलला आणखी एक शतक झळकावे लागेल.
हेही वाचा : IPL 2026 : “आधी जिम, मग पॉवर हिटिंग….” कॅप्टन कुल धोनी गाळतोय घाम; दिवसाचे बनवले खास शेडयूल; वाचा सविस्तर
या वर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत बोलायचे झाले तर, तर शुभमन गिल देखील या यादीत अव्वल स्थानी आहे. या वर्षी शुभमन गिलने ८ सामन्यांमध्ये १५ डावांमध्ये ६९.९२ च्या सरासरीने ९७९ धावा फटकावल्या आहेत. त्याला आता १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ २१ धावांची आवश्यकता आहे. तथापि, या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल चारमध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. शुभमन गिल व्यतिरिक्त, इतर तीन खेळाडूंमध्ये केएल राहुल (७४५ धावा), यशस्वी जयस्वाल (६६२ धावा) आणि रवींद्र जडेजा (६५९ धावा) यांचा देखील समावेश आहे.