महेंद्रसिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार?
स्टेडियमच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे की, “गेल्या दोन महिन्यांपासून, त्याचे वेळापत्रक खूप निश्चित झाले आहे. तो दुपारी १:३० च्या सुमारास स्टेडियममध्ये येतो. पोहोचल्यानंतर, तो जिममध्ये सुमारे एक तास घालवल्यानंतर तो त्याचे पॅड घालतो आणि नेट्समध्ये सुमारे दोन तास पॉवर हिटिंगचा सराव करत असतो.” जर मध्यवर्ती खेळपट्टी रिकामी असेल आणि कोणताही सामना सुरू नसेल, तर तो वेगवेगळ्या सामन्यांच्या परिस्थितीनुसार मैदानावर फलंदाजीचा सराव करत असतो. यानंतर, धोनी सुमारे अर्धा तास पोहतो आणि संध्याकाळी ६ वाजता स्टेडियममधून बाहेर जातो. अधिकाऱ्याने असे देखील सांगितले की, “धोनी नेहमीच जे करत आला आहे तेच तो करत असतो; कठोर परिश्रम.”
या वर्षीच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ गेल्या १६ हंगामात पहिल्यांदाच सर्वात सुमार कामगिरी करणारा संघ राहिल आहे. चेन्नईला १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले आहेत. चेन्नई २०२५ मध्ये प्लेऑफ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता, त्यामुळे चाहत्यांना नाराज व्हावे लागले होते. एम एस धोनीने या वर्षी १४ सामन्यांपैकी १३ डावांमध्ये २४.५० च्या सरासरीने १९६ धावा फटकावल्या आहेत.
हेही वाचा : IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती






