
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs South Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेचा पहिला सामना हा कोलकता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारताच्या संघाच्या हाती पहिले 10 ओव्हर कठीण होते कारण यावेळी टीम इंडियाच्या हाती एकही विकेट लागला नाही. त्यानंतर भारताचा स्टार जसप्रीत बुमराह याने सलग दोन ओव्हरमध्ये दोन विकेट घेऊन संघाला महत्वाचे विकेट घेऊन दिले कारण एडन मारक्रम आणि रायन रिकल्टन हे दोघेही चांगल्या लयीत झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावामध्ये तीन विकेट्स गमावून 105 धावा केल्या आहेत. भारताच्या संघाने बऱ्याच वर्षानंतर चार फिरकी गोलंदाजांना संघामध्ये सामील केले होते. यामध्ये कुलदीप यादव, अक्षर पटेल, वाॅशिग्टन सुंदर आणि रविद्र जडेजा यांना स्थान मिळाले आहे. त्याचा फायदा भारताच्या संघाला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याला फसवले आणि बाहेरचा रस्ता दाखवला.
दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार! BCCI ला केली एक खास विनंती
पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. या पहिल्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रायन रिकल्टन याने संघासाठी 23 धावा केल्या आणि जसप्रीत बुमराह याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तर त्यानंतर एडन मारक्रम याला बाहेरचा रस्ता दाखवला. एडन मारक्रम याने संघासाठी 31 धावा केल्या आणि विकेट गमावली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने फार काही चांगली कामगिरी केली नाही त्याने 3 धावा करुन कुलदीप यादव याने त्याला फसवले आणि विकेट गमावली.
Lunch on Day 1. 2⃣ wickets for Jasprit Bumrah and 1⃣ wicket for Kuldeep Yadav in an entertaining first session of the series 👌 We will be back soon with the 2nd session 👍 Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/G0rMk1w0dz — BCCI (@BCCI) November 14, 2025
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघ भारतात विजयाच्या दीर्घकाळापासूनच्या अभावाला संपवण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी येथे गेल्या सातपैकी सहा कसोटी गमावल्या आहेत, त्यामुळे हा सामना आव्हान आणि संधी दोन्ही सादर करतो. दरम्यान, भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. आनंदाची बातमी अशी आहे की ऋषभ पंत तंदुरुस्त झाला आहे आणि ध्रुव जुरेलला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी, कागिसो रबाडा आणि मार्को जानसेन ही वेगवान गोलंदाजी जोडी महत्त्वाची असेल, तर केशव महाराज आपल्या अनुभवी फिरकी गोलंदाजीने प्रभाव पाडू शकतात. भारतासाठी, सर्वांचे लक्ष रवींद्र जडेजावर असेल, जो ३०० बळी आणि ४,००० धावांचा दुहेरी विक्रम पूर्ण करण्यापासून फक्त १० धावा दूर आहे.