फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. हि मालिका भारतील संघासाठी फार महत्वाची आहे, भारताच्या संघाने ज्याप्रकारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलला युवा संघासह सुरुवात केली आहे ते खरचं कौतुकास्पद आहे. आता भारतीय संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव लवकरच लग्न करणार आहे. त्याने आता बीसीसीआयला याबाबत एक खास विनंती केली आहे.
कुलदीप तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळतो आणि आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होत आहे. त्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका होईल. जर कुलदीपला परवानगी मिळाली तर तो मालिकेच्या मध्यात टीम इंडिया सोडू शकतो.
भारताच्या कसोटी संघात इतिहासात कधी खेळले होते चार फिरकीपटू? काय लागला होता निकाल? वाचा सविस्तर
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, कुलदीप यादवने बीसीसीआयकडे काही दिवसांची रजा मागितली आहे. कुलदीप महिन्याच्या अखेरीस लग्न करण्याचा विचार करत आहे आणि आता तो बीसीसीआयच्या परवानगीची वाट पाहत आहे. सुरुवातीला आयपीएलनंतर त्याचे लग्न होणार होते, परंतु स्पर्धा काही दिवस पुढे ढकलण्यात आली. परिणामी, त्याला त्याच्या लग्नाच्या योजना रद्द कराव्या लागल्या.
Kuldeep Yadav gets engaged to his childhood friend Vanshika. (Abhishek Tripathi). – Many congratulations to them. ❤️ pic.twitter.com/fdTncdtYa4 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025
आता, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की कुलदीप यादवला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टीची आवश्यकता आहे. दुसरी कसोटी २२ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे सुरू होणार आहे, तर पहिली एकदिवसीय ३० नोव्हेंबर रोजी रांची येथे होणार आहे. लग्नासाठी सुट्टी मिळाल्यास तो दोन्ही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाशी लग्न केले आहे आणि त्याची मंगेतर एलआयसीमध्ये काम करते.
गेल्या वर्षीच्या घरच्या कसोटी हंगामात कुलदीप यादवला वगळण्यात आले होते, तरीही टीम इंडिया फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्ट्यांवर खेळत होती. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही खेळू शकला नाही. तथापि, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि दोन सामन्यांमध्ये १२ बळी घेतले. तो या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. परिणामी, आता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संधी दिली जाऊ शकते.






