
IND vs SA, 3rd ODI: India's blank slate in Visakhapatnam! Away from victory for the last six years; Read in detail
IND vs SA, 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळून झाले आहेत. रांची येथील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला तर रायपूर येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४ विकेट्सने पराभव केला. तीन सामन्यांची मालिका आता १-१ अशा बरोबरीत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ६ डिसेंबर २०२५ रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्टेडियमवर भारताचा मागील सहा वर्षाचा रेकॉर्ड वाईट राहिला आहे.
तिसरा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी आवश्यक असणार आहे कारण हा सामना जिंकणारा संघ मालिका देखील जिंकेल. हा तिसरा महत्त्वाचा सामना सुरू होण्यापूर्वी, स्टेडियमच्या इतिहासाबद्दल आपं जाणून घेऊया. येथे पहिला एकदिवसीय सामना २००५ मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हापासून, तेथे एकूण १० एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने सात जिंकले आणि दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
हेही वाचा : IND vs SA 2nd ODI : रायपूरच्या मैदानात काय घडलं? Virat Kohli च्या दिशेने चाहता आला धावत; Video Viral
विशाखापट्टणममध्ये भारताने शेवटचा एकदिवसीय सामना मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. मात्र, यावेळी भारतीय संघ इतिहास बदलण्याचा आणि आफ्रिकन संघाला हरवून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने विशाखापट्टणममध्ये आपला शेवटचा एकदिवसीय विजय २०१९ मध्ये नोंदवला होता. भारतीय संघाने डिसेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणममध्ये आपला शेवटचा विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला १०७ धावांनी पराभूत केले होते.
आफ्रिकन संघाबद्दल सांगायचे झाले तर विशाखापट्टणममध्ये हा त्यांचा पहिलाच एकदिवसीय सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने येथे एकही एकदिवसीय सामना खेळलेला नसला तरी, त्यांनी विशाखापट्टणममध्ये कसोटी आणि टी२० सामने मात्र खेळेले असल्यामुळे स्टेडियमचा अंदाज असणार आहे.
हेही वाचा : AUS vs ENG, Ashes series 2025 : मिचेल स्टार्कने केला वसीम अक्रमचा विक्रम उद्ध्वस्त! विश्वविक्रमाला घातली गवसणी