
IND vs SA 5th T20I: Hardik Pandya's romantic gesture! Gave a flying kiss to Mahika Sharma after scoring a half-century! VIDEO VIRAL
Hardik Pandya and his girlfriend Mahika Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिका संपली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३० धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अधिक आक्रमक दिसून आला. त्याने १६ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी त्याने अर्धशतक झळकवताच त्याने त्याची प्रियसी महिका शर्माला फ्लाईंग कीस दिला.
हेही वाचा : IND U19 vs SL U19 : सेमीफायनलमध्ये भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा! दिमाखात केली दहाव्यांदा अंतिम फेरीत एंट्री
भारतीय डावाची सुरुवात करणाऱ्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेवर सुरुवातीपासूनच दबाव आणला आणि आपल्या डावाची सुरुवात चांगलीच दमदार केली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक दिसून आले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी महत्त्वाची ६३ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसनने २२ चेंडूत ३७ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने चार चौकार आणि २ षटकार लगावले तर अभिषेक शर्माने २१ चेंडूत ३४ धावांची जलद खेळी केली.
हार्दिक पंड्याचे जलद अर्धशतक
हार्दिक पंड्याने मैदानावर येताच आपली आक्रमक शैलीचे दर्शन घडवले. त्याने फक्त १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून दुसरा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला. या खेळीसह त्याने अभिषेक शर्माला पिछाडीवर टाकले. तर युवराज सिंगचा १२ चेंडूंचा विक्रम अजून देखील कायम आहे. हार्दिकने २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राईक रेट २५२ होता. त्याला साथ देणारा तिलक वर्माने देखील शानदार खेळी केली. त्याने ४२ चेंडूत ७३ धावा केल्या. यामध्ये त्याने १० चौकार आणि १ षटकार लागावला.
हार्दिक पंड्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर खास सेलिब्रेशन केले जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पंड्याने स्टँडवर बसून असलेल्या त्याच्या प्रेयसी माहिका शर्माला फ्लाइंग किस दिला. माहिका हसली आणि त्या चुंबनाचे उत्तर देखील दिले. हा खास क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
हेही वाचा : IND vs SA: संजू सॅमसनने केला डबल धमाका, रचला इतिहास; सूर्यकुमार-अभिषेक शर्मासह खास क्लबमध्ये केली एंट्री
संजू, अभिषेक, तिलक आणि हार्दिक यांच्या दमदार खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. प्रतिउत्तरात दक्षिणआफ्रिकेचा संघ २० षटकात २१० धावाच करू शकला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.