
IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत इशान किशनच्या शतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून २७१ धावा केल्या. न्यूझीलंडला हा सामना जिंकायचा असेल तर २७२ धावा कराव्या लागणार आहे. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये इशान किशनचा शतकी तडाखा! न्यूझीलंडची गोलंदाजी लाईनअप केली उद्ध्वस्त
या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारताची सुरुवात स्फोटक झाली असली तरी तिसऱ्याच ओव्हरमध्ये संजू सॅमसन ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. अभिषेक शर्मा १६ चेंडूत ३० धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. अभिषेक शर्माच्या विकेटनंतर इशान किशन मैदानात आला. त्याने सुरवातीपासून किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई करायला सुरुवात केली. त्याने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र त्याने चौथा गियर टाकला आणि किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. मैदानावर असलेल्या सूर्यकुमार यादवने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्या आणि इशान या दोघांनी १३७ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा : IND vs NZ 5Th T20: ‘सूर्या’ पुन्हा तळपला! न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची तडाखेबंद खेळी
सूर्यकुमार यादव ३० चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६३ धावा करून बाद झाला. त्याला कर्णधार मिचेल सँटनरने बाद केले. सूर्याच्या बाद होण्याचा इशान किशनच्या खेळीवर काही एक परिणाम झाला नाही. पुढे इशानने ४२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर तो ४३ चेंडूत ६ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १०३ धावा करून तो बाद झाला. त्याला जेकब डफीने आपली शिकार बनवले. त्याच्यानंतर मैदानात आलेला हार्दिक पंड्याने आक्रमक खेळ करून १७ चेंडूत ४२ धावा केल्या. यामध्ये त्याने १ चौकार आणि ४ षटकार लागवले. त्याला काइल जेमिसनने बाद केले. त्यानंतर रिंकू सिंग ८ धावा आणि शिमव दुबे ७ धावा करून नाबाद राहून संघाला २७१ पर्यंत पोहचवले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर जेकब डफी, काइल जेमिसन आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break! #TeamIndia smash their 3⃣rd highest T20I total to put on a massive 2⃣7⃣1⃣/5 🎇 👏 Over to our bowlers now! Scorecard ▶️ https://t.co/AwZfWUTBGi#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RJcIvv8rAA — BCCI (@BCCI) January 31, 2026
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी