संजू सॅमसनने रचला इतिहास (फोटो सौजन्य - iStock)
भारताच्या सर्वात कमी चेंडूत १००० टी-२० धावा
सूर्यकुमारने केले स्पष्ट
टीम इंडिया या सामन्यात तीन बदलांसह खेळत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान घोषणा केली की शुभमन गिल या सामन्यात खेळत नाहीये, त्यामुळे संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. शुभमन गिलची जागा संजू सॅमसनने घेतली आहे, हर्षित राणाची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आहे आणि कुलदीप यादवची जागा वॉशिंग्टन सुंदरने घेतली आहे. सूर्यकुमार पुढे म्हणाला की, “पुढील वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषक होणार असल्याने संघासाठी शेवटचा सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्यातून आपल्याला मालिका जिंकण्यापेक्षा काय हवे आहे ते अधिक महत्त्वाचे आहे.”
संजूने केली होती संथ सुरूवात
संजू सॅमसनने सावधगिरीने डाव सुरू केला आणि तिसऱ्या चेंडूवर त्याचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने मार्को जॅन्सनला षटकार मारला. हा षटकार त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरला, कारण तो भारतासाठी त्याची १००० वी टी२० धाव होती.
या सामन्यापूर्वी संजूला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त पाच धावांची आवश्यकता होती आणि त्याने कोणत्याही दबावाशिवाय तो साध्य केला. यासह, तो टी२० मध्ये भारतासाठी १००० धावा पूर्ण करणारा १४ वा भारतीय फलंदाज आणि एकूण तिसरा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे.
IND vs SA 5th t20I : दक्षिण आफ्रिकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; सूर्या आर्मी करणार फलंदाजी
दोन्ही संघातील खेळाडू
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन






