
IND vs SA: Shubman Gill, Jaiswal and Sudarshan also sweated on the field! Preparations for the Test series against South Africa are on the rise
IND vs SA Test series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ मैदानात कसून सराव करत आहेत. भारतीय कर्णधार शुभमन गिलला हे ठाऊक आहे की, मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरूपातून रेड-बॉल क्रिकेटमध्ये परतण्यास वेळ लागतो, आणि म्हणूनच, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी त्याने मंगळवारी कोलकाता येथे नेटमध्ये सुमारे दीड तास घालवला आणि आपले फलंदाजीचे कौशल्य सुधारले. गेल्या महिन्यात आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये गिलने अर्धशतक आणि नाबाद शतक झळकावले होते, परंतु त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावा काढण्यास तो संघर्ष करत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय आणि टी २० सामन्यांमध्ये आठ डावांमध्ये तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही, त्याची सर्वोच्च धावसंख्या ४६ होती. पण कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, तो वचनबद्ध दिसला आणि सराव सत्रांमध्ये त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहाय्यक प्रशिक्षक सीतांशू कोटक हे नेट प्रॅक्टिसपूर्वी गिलशी दीर्घ चर्चा करताना दिसले. गिल नंतर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण सरावासाठी त्याच्या सहकाऱ्यांसोबत सामील झाला आणि नंतर यशस्वी जयस्वालसोबत नेटवर गेला. फिरकीपासून सुरुवात करून, त्याने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा सामना केला.
जलद गोलंदाजीच्या नेटमध्ये, गिलने प्रथम काही षटके जसप्रीत बुमराहचा सामना केला. त्यानंतर त्याने नितीश कुमार रेड्डी आणि काही स्थानिक क्लब गोलंदाजांचा सामना नेटमध्ये तासाहून केला. एक अधिक वेळ घालवल्यानंतर, गिल गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांच्या देखरेखीखाली ३० मिनिटे थ्रोडाऊनचा सराव करण्यासाठी मैदानावर गेला.गोलंदाजी प्रशिक्षकाने स्वतः त्याला जवळून गोलंदाजी केली. रणजी ट्रॉफीमध्ये ६७आणि १५६ धावा करणाऱ्या जयस्वालनेही मोर्केल आणि श्रोडाऊनचा सामना करताना बराच वेळ विकेटवर घालवला. डाव्या हाताचा फलंदाज आरामदायी दिसत होता.
हेही वाचा : पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहच्या घरावर अंदाधुंद गोळीबार, थोडक्यात बचावले संपूर्ण कुटुंब
सुमारे तीन तासांच्या सरावानंतर, गंभीर, कोटक, मॉर्केल आणि गिल या संघाच्या थिंक टँकने मुख्य खेळपट्टीची पाहणी केली आणि दीर्घ चर्चा केली. मॉर्केल आणि गिल यांनी क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्याशी १५ मिनिटे चर्चा केली. त्यांच्या हावभावावरून असे दिसून आले की व्यवस्थापन पूर्णपणे समाधानी नव्हते. खेळपट्टी हलक्या गवतासह तपकिरी दिसत होती. बंगाल असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आधीच स्पष्ट केले की, संघ व्यवस्थापनाने टर्निंग पिचसाठी विनंती केलेली नाही.
नेट्समध्ये लक्षणीय वेळ घालवणारा आणखी एक फलंदाज म्हणजे तामिळनाडूचा तरुण फलंदाज साई सुदर्शन, ज्याने दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ संघासाठी दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये फक्त ८४ धावा केल्या. संघ व्यवस्थापन त्याला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून तयार करत आहे, परंतु तो अद्याप अपेक्षांनुसार कामगिरी करु शकलेला नाही. ध्रुव जुरेलने आफ्रिका अ विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावून तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानासाठी आपला दावा मजबूत केला. केएल राहुल, जुरेल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या पर्यायी सराव सत्रात सहभागी झाले नाहीत. वेगवान गोलंदाजांपैकी, फक्त बुमराह सरावासाठी आला आणि त्याने ऑफ स्टंपला लक्ष्य करून दोन्ही स्टंपवर हलके गोलंदाजी केली.