
फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मिडिया
India vs Sri lanka Women’s T20 Series Schedule : भारतीय महिला संघाने झालेल्या विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली आणि पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या संघाने विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. विश्वचषकाची सुरुवात विजयाने केल्यानंतर टीम इंडियाला काही सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन सामना नावावर केला होता. आता भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे.
त्याआधी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर आता भारताचा संघ पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये दोन्ही संघामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. याची घोषणा बीसीसीआयने त्याच्या सोशल मिडियावर केली आहे. या मालिकेची सुरुवात ही डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे.
मालिकेचे पाच सामने हे दोन मैदानावर खेळवले जाणार आहेत. पहिला सामना हा विशाखापट्टणम येथे होणार आहे तर दुसरा सामना देखील त्याच मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यानंतर इतर सर्व सामने हे तिरुवनंतपुरम येथे खेळवले जाणार आहेत. भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची असणार आहे. त्यामुळे भारताचा संघ या मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
| क्रमांक | सामने | तारिख | ठिकाण |
|---|---|---|---|
| पहिला टी20 सामना | भारत विरुद्ध श्रीलंका | 21 डिसेंबर 2025 | विशाखापट्टणम |
| दुसरा टी20 सामना | भारत विरुद्ध श्रीलंका | 23 डिसेंबर 2025 | विशाखापट्टणम |
| तिसरा टी20 सामना | भारत विरुद्ध श्रीलंका | 26 डिसेंबर 2025 | तिरुवनंतपुरम |
| चौथा टी20 सामना | भारत विरुद्ध श्रीलंका | 28 डिसेंबर 2025 | तिरुवनंतपुरम |
| पाचवा टी20 सामना | भारत विरुद्ध श्रीलंका | 30 डिसेंबर 2025 | तिरुवनंतपुरम |
🚨 News 🚨 Schedule for @IDFCFIRSTBank T20I series against Sri Lanka Women announced. Details ▶️ https://t.co/jYCdTE8YhA#TeamIndia | #WomenInBlue | #INDvSL pic.twitter.com/wK4d5c0XLQ — BCCI Women (@BCCIWomen) November 28, 2025
भारताच्या संघाने या मालिकेसाठी आतापर्यत संघाची घोषणा केलेली नाही. विश्वचषकामध्ये सामील झालेल्या खेळाडूंना मागील 1 महिना विश्रांती देण्यात आली होती त्यामुळे आता संघ पुन्हा नव्या चॅम्पियन प्रवासासाठी सज्ज झाला आहे. 2026 मध्ये पुरुषांचा विश्वचषक फेब्रुवारीमध्ये खेळवला जाणार आहे, याचे आयोजन भारत आणि श्रीलंका हे दोन देश करणार आहे. यासाठी वेळापत्रक आणि ठिकाणे यांची घोषणा करण्यात आली आहे.