
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs Sri Lanka Women T20 Series : भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे, या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवल्यानंतर भारताचा संघ आता मालिका जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली होती तर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
भारतीय संघाच्या पहिल्या सामन्याच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या सामन्यामध्ये जेमिमा रोड्रीग्स हिने नाबाद खेळी खेळी खेळून भारतीय संघासाठी एकतर्फी सामना जिंकला होता. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने केलेल्या कामगिरीनंतर भारताच्या खेळाडूंनी तोच फाॅर्म तसाच ठेवला आणि कमालीचा खेळ दाखवला. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने दमदार सुरूवात केली आणि शेफाली वर्मा हिने कौतुकास्पद फलंदाजी करुन भारताच्या संघाला विजय मिळवून दिला.
भारताच्या संघाने डावाची सुरुवात केली, पण ही भागीदारी जास्त काळ टिकली नाही. कविष्काने मंधनाला बाद करून भारताला पहिला धक्का दिला, जी ११ चेंडूत १४ धावा करून बाद झाली, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार होता. तथापि, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शेफाली वर्मा यांनी त्यानंतर एक जबरदस्त भागीदारी केली. जेमिमा आणि शेफालीने आक्रमक फलंदाजी करत आठव्या षटकात भारताची धावसंख्या ८० च्या पुढे नेली. काव्या कविंदीने जेमिमा रॉड्रिग्जला बाद करून भारताला दुसरा धक्का दिला.
Vizag ✈️ Trivandrum Travel diaries, ft. #TeamIndia 🙌#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5CltmEyDHr — BCCI Women (@BCCIWomen) December 25, 2025
तथापि, जेमिमा १५ चेंडूत २६ धावा करून बाद झाली, ज्यामध्ये चार चौकार आणि एक षटकार होता, ज्यामुळे भागीदारी संपुष्टात आली. जेमिमा आणि शेफालीने दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर १२ चेंडूत १० धावा करून बाद झाली. मागील दोन सामन्यामध्ये स्मृती मानधना हिचा चांगला फार्म पाहायला मिळाला नाही त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघासाठी ती कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तिसरा सामना हा भारताचा 26 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे, हा सामना ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.
दोन्ही संघाची दुसऱ्या सामन्यामधील प्लेइंग ११
भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, श्री चरणी.
श्रीलंका: विश्मी गुणरत्ने, चामारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, कौशानी नुथ्यांगना (यष्टीरक्षक), मल्की मदारा, इनोका रणवीरा, काव्या कविंदी, शशिनी गिम्हानी.