Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL Test: भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर! मेंडिस-निसांका बाहेर; ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक

Sri lanka Announced Squad for ind vs sl test series: श्रीलंकेने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. धनंजय डी सिल्वाच्या हाती संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 04:42 PM
IND vs SL Test: भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर! मेंडिस-निसांका बाहेर; ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक
Follow Us
Follow Us:
  • भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर
  • मेंडिस-निसांका बाहेर
  • ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक
भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. धनंजय डी सिल्वाकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला जवळपास तीन वर्षांनंतर श्रीलंकेच्या कसोटी संघात परतला आहे. ३३ वर्षीय डिकवेला शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २०२३ मध्ये खेळला होता. पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवली जाईल. दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवली जाईल.

Cricket News: World Cup 2027 च्या नव्या फॉरमॅटवरून ICC विरुद्ध मोर्चा! ‘या’ दोन देशांचा तीव्र विरोध; उपस्थित केले गंभीर सवाल

मेंडिस- निसांका कसोटीतून बाहेर, डिकवेलासाठी मार्ग मोकळा

डिकवेलाच्या पुनरागमनाचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुशल मेंडिसची अनुपस्थिती. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मेंडिस निवडीसाठी उपलब्ध नाही. पथुम निसांका देखील मनगटाच्या शस्त्रक्रियेतून सावरत आहे. यामुळे, कुसल मेंडिस आणि पथुम निसांका पहिल्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकेच्या फलंदाजीच्या फळीत एक पोकळी निर्माण झाली आहे. याच कारणामुळे वयाच्या ३३ व्या वर्षी डिकवेलाचा पुन्हा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

Sri Lanka have unveiled squad for the first home Test against India in Galle 📝#WTC27https://t.co/IqRQEOQinO — ICC (@ICC) August 12, 2026

केसरा नुवान्था- पसिंदू सुरियाबंदरा संधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप एकही सामना न खेळलेल्या केसरा नुवान्था आणि अव्वल फळीतील फलंदाज पसिंदू सुरियाबंदर यांचाही श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळलेला डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याचेही संघात पुनरागमन झाले आहे. पथुम निसांका संघाबाहेर असल्याने, पसिंदू सुरियाबंदरलाही संघात आपले स्थान टिकवून ठेवण्याची संधी मिळाली आहे. मात्र, श्रीलंकेकडून निशन मदुष्का आणि लाहिरू उदारा डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या मागील कसोटीत दोघांनीही डावाची सुरुवात केली होती. मदुष्काने भारताविरुद्धच्या सराव सामन्यात डावाची सुरुवात करून एक शानदार अर्धशतक झळकावले होते. मधल्या फळीत दिनेश चांदीमल, कामिंदू मेंडिस आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा हे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे.

घरच्या मालिकेसाठी चार वेगवान गोलंदाज

श्रीलंकेने घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी चार वेगवान गोलंदाजांची नावे जाहीर केली आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू मिलन रत्नायकेच्या रूपात पाचवा वेगवान गोलंदाजीचा पर्यायही आहे. सिथा फर्नांडो खेळण्याची सर्वाधिक शक्यता असून, संघरचनेनुसार गोलंदाज म्हणून लाहिरू कुमार, विश्व फर्नांडो आणि दिलशान मदुशंका यांचीही निवड होण्याची शक्यता आहे.

संघात तीन आघाडीचे फिरकी गोलंदाज

श्रीलंकेने तीन फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या हा संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. च्यासोबत, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण न केलेल्या केसरा नुवान्था किंवा रमेश मेंडिस या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. डावखुरा फिरकी अष्टपैलू सोनल दिनुशा देखील संघात असून तो खालच्या फळीत फलंदाजी करण्यासोबतच गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी करु शकतो.

भारताविरुद्धच्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुशंका, कामिंदू मेंडिस, दिनेश चांदीमल, पसिंदू सुरियाबंदरा, सोनल दिनुषा, निरोजन डिकवेला, रमेश मेंडिस, प्रभाथ जयसूर्या, केशरा नुवांथा, मिलान रत्नायके, असिथा फर्नांडो, लाहिरु कुमारा, विश्वा फर्नांडो, दिलशान मदुशंका

Lionel Messi चा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक; नेमकं कारण काय? मैदानावर कधी परतणार?

Web Title: Ind vs sl test sri lanka squad dhananjaya de silva niroshan dickwella

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • IND vs SL
  • sri lanka cricket team
  • Test Series

संबंधित बातम्या

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार
1

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यावर सिराजची मजामस्ती, सलॉनमध्ये ट्रिमर उचलून कापले सरफराजचे केस, Video Viral
2

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यावर सिराजची मजामस्ती, सलॉनमध्ये ट्रिमर उचलून कापले सरफराजचे केस, Video Viral

IND vs SL: १५ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? JioHotstar नाही, तर ‘या’ चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण
3

IND vs SL: १५ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? JioHotstar नाही, तर ‘या’ चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण

Sarfaraz Khan: टीम इंडियात दमदार कमबॅक, सरफराज खानचं शेवटपर्यंत पक्कं नव्हतं नाव; Inside Story
4

Sarfaraz Khan: टीम इंडियात दमदार कमबॅक, सरफराज खानचं शेवटपर्यंत पक्कं नव्हतं नाव; Inside Story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.