IND vs WI 2nd Test: Form picked up after becoming captain! Shubman Gill breaks Sangakkara-Jayawardene's record; Read in detail
Shubman Gill’s tremendous form : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने दूसरा दिवस संपला तेव्हा ३८७ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपत आहे. तो खोऱ्याने धावा काढत आहे. खर म्हणजे त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपद आल्यापासून तो धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. तो मोठ मोठे विक्रम रचत आहे आणि मोडत देखील आहे. अशातच त्याने आता संगकारा आणि जयवर्धने या श्रीलंकन दिग्गजांचा विक्रम मोडला आहे.
शुभमन गिलने दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात आणखी एक शतक ठोकले आहे. कर्णधार म्हणून गिलचे भारतातील हे पहिलेच शतक आहे. गिलने १९६ चेंडूत १२९ धावा केल्या. यामध्ये त्याने १६ चौकार आणि दोन षटकार मारले. ९ तो १२९ धावा करून नाबाद राहिला. भारताने त्यांचा पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला.
हेही वाचा : IND vs WI : द्विशतक कुणामुळे हुकले? धावबाद होण्याला शुभमन गिल जबाबदार? यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला
भारताचा कर्णधार झाल्यापासून शुभमन गिल चांगलाच फॉर्ममध्ये आला आहे. त्याने कर्णधार झाल्यापासून सात सामन्यांमध्ये १२ डावात ८४.८१ च्या सरासरीने पाच शतके आणि एक अर्धशतकही झळकावले आहे. किमान सात कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत गिलची सरासरी ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कुमार संगकाराने १५ सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व केले असून त्याने २६ सामन्यांमध्ये ६९.६० च्या सरासरीने १६०१ धावा फटकावल्या आहे. कर्णधार म्हणून संगकाराने सात शतके आणि चार अर्धशतके देखील झळकवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आता या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. स्मिथने ४० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले असून त्याने ६९ डावांमध्ये ६८.९८ च्या सरासरीने ४१३९ धावा फटकावल्या आहेत. कर्णधार म्हणून स्मिथने १७ शतके आणि १४ अर्धशतके ठोकली आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : मोहसिन नक्वीची आता खैर नाही! ICC मधून होणार हकालपट्टी? BCCI चा मोठा निर्णय..
डॉन ब्रॅडमन यांनी कर्णधार म्हणून २४ सामन्यांमधील ३८ डावांमध्ये १०१.५१ च्या सरासरीने ३१४७ धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्यांनी १४ शतके आणि सात अर्धशतके झळकवली आहेत. जर गिल पुढे असाच खेळत राहिला तर तो लवकरच कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सरासरीसाठी ब्रॅडमन यांना देखील मागे टाकण्याची शक्यता आहे.