बीसीसीआय आणि मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK Final : आशिया कप २०२५ स्पर्धा अलीकडेच संपली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप २०२५ चे जेतेपद जिंकले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगलेच थरार नाट्य रंगले. ते अजून देखील थांबलेले नाही. आशिया कपची ट्रॉफीवरून आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदमधून हकालपट्टी करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. मोहसिन नक्वी यांनी अद्याप आशिया कप ट्रॉफी बीसीसीआयकडे सोपवलेली नाही, ज्यामुळे बीसीसीआय कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा : IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम
पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे मोहसिन नक्वी यांना आयसीसी संचालकपदावरून काढून टाकण्याची विनंती करण्याची योजना तयार करत आहे. जेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर पीसीबी अध्यक्ष आशिया कप ट्रॉफी विजेत्या भारताला देण्यास तयार होत नाहीत. अशा वेळी हा अहवाल समोर आला आहे. वृत्तांनुसार, नक्वी यांनी आपल्या मतावर ठाम राहून आशिया कपची ट्रॉफी ही एसीसीच्या दुबई येथील मुख्यालयात बंद केली आहे.
भारताने आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवून जेतेपद पटकावले, परंतु संघातील खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ट्रॉफी आपल्या ताब्यात घेऊन निघून गेले होते. त्यामुळे वादाला आणखीनच तोंड फुटले.
पीटीआयच्या वृत्तांनुसार, बीसीसीआय आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या वादग्रस्त कृतींचा मुद्दा आयसीसीकडे उपस्थित करणार असल्याच्या विचारात आहे. अहवालांमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआय त्यांना आयसीसी संचालक पदावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND vs WI : द्विशतक कुणामुळे हुकले? धावबाद होण्याला शुभमन गिल जबाबदार? यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला
वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणात मोहसिन नक्वी यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल ही पाहणे बाकी आहे. मोहसिन नक्वी यांची कृती करत आहेत ते पूर्णपणे चुकीची असून बीसीसीआय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहे.