IND vs WI 1st Test: 'Yorker King' a blast! Bumrah's fiery balls blew away the Caribbean batsmen; Watch the video
IND vs WI 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिली कसोटी अहमदाबाद येथे खेळली जात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १६२ धावा केल्या. भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांकहा निभाव लागू शकला नाही. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा त्याच्या घातक गोलंदाजीचे कौशल्य दाखवून दिले. बुमराहच्या यॉर्कर आणि अचूक लाईन अँड लेंथने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पूर्णपणे अडचणीत आणले. या डावात बुमराहने एकूण तीन विकेट्स मिळवल्या. ज्यात दोन उत्कृष्ट यॉर्करचा समावेश होता. बीसीसीआयकडून या चेंडूंचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. , “दोन उत्कृष्ट चेंडू, समान निकाल.”
हेही वाचा : IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल
जसप्रीत बुमराहने ३९ वे षटक टाकले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने जस्टिन ग्रीव्हज क्लीन बोल्ड केले. जसप्रीत बुमराहचा यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर पडला आणि स्टंप उखडले गेले. ग्रीव्हज फक्त चेंडूकडे पाहतच राहीला, त्याला काय झाले याबद्दल त्याला काही कळले नाही. तो विचार करत काही वेळ क्रिजवर उभा राहिला. ग्रीव्हजने सामन्यात सर्वाधिक ३२ धावा केल्या.
४१ व्या षटक टाकणाऱ्या बुमराने या षटकात एक परिपूर्ण यॉर्कर टाकला. बुमराहने जोहान लिनला बाद केले. चेंडू त्याच्या बचावफळीला छेद देत ऑफ आणि मिडल स्टंपवर जाऊन आदळला. षटकात जोहानने फक्त १ धाव काढली. तो बुमराहच्या गोलंदाजीने पूर्णता आश्चर्यचकित झालेला दिसून आला.
Two fiery deliveries, two similar results 🔥🔥 Jasprit Bumrah, you absolute beauty!#TeamIndia @IDFCfirstbank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/JNcPGJxK8I — BCCI (@BCCI) October 2, 2025
वेस्ट इंडिज संघाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागू शकला नाही. जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर शाई होपने २६ आणि कर्णधार रोस्टन चेस २४ धावांवर माघारी परतले. भारताकडून मोहम्मद सिराजने १४ षटकात ४० धावा देत चार बळी टिपले. बुमराहनेही देखील ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. तसेच कुलदीप यादवने दोन बळी घेतले.
हेही वाचा : IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
वेस्ट इंडिजच्या १६२ धावांच्या प्रतिउत्तरात भारतीय संघाच्या डावाची सुरवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरवात केली. या दोघांनी ६८ धावा जोडल्या. यशस्वी जैस्वाल ३६ धावा करून माघारी गेला. त्यानंतर साई सुदर्शन देखील झटपट ७ धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी डाव सावरला. या दरम्यान केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. दिवसाअखेर केएल राहुल ५३ धावा करून तर शुभमन गिल १८ धावा करून नाबाद आहेत. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेस आणि जेडेन सील्स, यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.