ध्रुव जुरेलकहा अप्रतिम झेल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा डाव 162 धावांवर गडगडला. भारतीय गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजची फलंदाजी टिकाव धरू शकली नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ४४.१ षटकात फक्त १६२ धावांवर आटोपला. या सामन्या भारताचा यष्टिरक्षक धृव जुरेलने मैदानावर सर्वांना आश्चर्यकारक धक्का दिला. त्याने हवेत उडून झेल घेतला. या झेलचा व्हीडीओ सद्या व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावादरम्यान भारताचा तरुण विकेटकीपर ध्रुव जुरेलने त्याच्या विकेटकीपिंगने सर्वांना प्रभावित केले. अनेक वेळा, त्याने हवेत सूर मारून उत्कृष्ट झेल टिपला आहे. त्याच्या चपळाईने गोलंदाजांचा आत्मविश्वासात भर पडली. जुरेलची ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्याचा झेल पाहून सर्वच अवाक झाले.
India got upgraded wicketkeeper & batsman over Rishabh Pant. Dhruv Jurel clears him by miles ❤️🔥pic.twitter.com/tTX0R5oETC — JJ (@JJhuMaybe) October 2, 2025
हेही वाचा : IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
वेस्ट इंडिजची फलंदाजी पूर्णतः ढेपाळली. या संघाचे फक्त काहीच फलंदाजच दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकले. जस्टिन ग्रीव्हजने सर्वाधिक ३२ धावा केल्या तर शाई होपने २६ आणि कर्णधार रोस्टन चेसने २४ धावा करून संघाला योगदान दिले. व्यतिरिक्त, उर्वरित फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर दम धरू शकले नाहीत. संघाच्या कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा आकडा कुणाला गाठता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली नाही.
भारताचा वेगवान गोलंदाजांनी या सामन्याच्या पहिल्या डावात चांगलाच कहर केला. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, त्याने १४ षटकांत ४० धावा देत तघमारे चंद्रपॉल, अॅलिक अल्थानाझ, ब्रँडन किंग आणि कर्णधार रोस्टन चेस यांना माघारी पाठवले.
जसप्रीत बुमराहने देखील शानदार गोलंदाजी करत १४ षटकांत ४२ धावा देत ३ विकेट्स चटकवल्या. भारताचा चायनामन कुलदीप यादवने फिरकी विभागात शानदार कामगिरी करत त्याने ६.१ षटकांत २५ धावा देऊन २ बळी टिपले आणि वेस्ट इंडिजचा डाव संपवला.
हेही वाचा : RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ