India vs West Indies: Kuldeep Yadav is now the king! Dhoni overtook Mohammed Siraj to claim the top spot
Kuldeep Yadav leaves Siraj behind : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत दोन्ही डाव मिळून आठ बळी घेतले. पहिल्या डावात त्याने पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेत भारताच्या विजयाचा पाया रचला आहे. या प्रभावी कामगिरीसह, कुलदीप या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील बनला आहे, त्याने आता संघ सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला मागे टाकले आहे, जो आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
हेही वाचा : IND VS AUS : ‘विराटच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी हरभजन सिंगची भविष्यवाणी
कुलदीप यादवची कामगिरी २०२५ मध्ये शानदार कमागिरी केली आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने गोलंदाजीने वेगळीच छाप पाडली आहे. आतापर्यंत त्याने १८ डावांमध्ये ३८ बळी घेतले आहेत. सिराजने १५ डावांमध्ये ३७ बळी घेतले आहेत आणि तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा नंबर लागतो. या सर्व गोलंदाजांनी भारतीय संघाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका वठवली आहे.
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने या वर्षी प्रत्येक फॉरमॅटममध्ये प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दोन सामन्यांमध्ये चार डावात १२ बळी टिपले आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने सात सामन्यामध्ये ९ बळी घेतले आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कुलदीपने सात सामन्यात १७ बळी घेऊन आपली खास छाप पडली आहे. आयपीएल २०२५ मध्येही त्याने आपली कमाल दाखवली आहे. त्याने १४ सामन्यात १५ बळी घेत सर्वांना प्रभावित केले. या आकडेवारीवरून ही मात्र स्पष्ट होते की, कुलदीप सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून तो प्रत्येक स्वरूपात संघासाठी सामना जिंकवून देणारा खेळाडू ठरत आहे.