Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs BAN W: बांग्लादेशला धूळ चारत टीम इंडिया Asian Games 2026 च्या फायनलमध्ये; आता श्रीलंकेशी ‘गोल्ड मेडल’ची लढाई

India W Beat Bangladesh W in asian games 2026 semifinal: आशियाई क्रीडा महिला क्रिकेट स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना बांग्लादेश आणि भारत यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या संघाने बांग्लादेशला मोठ्या फरकाने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 03:07 PM
India W Beat Bangladesh W in asian games

India W Beat Bangladesh W in asian games

Follow Us
Follow Us:
  • भारताची विजयी वाटचाल कायम
  • बांग्लादेशवर मात
  • फायनलमध्ये श्रीलंकेशी भिडणार
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत महिला क्रिकेटमधील चा दुसरा उपांत्य सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांग्लादेश आमनेसामने आले. हा सामना  रविवार, २० सप्टेंबर रोजी जपान येथील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर खेळला गेला. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रात कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने २० षटकांत ४ विकेट्स गमावून १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांग्लादेशचा संघ १५.४ षटकांत केवळ ८१ धावा करत तंबूत परतला. भारताने बांग्लादेशला ११४ धावांनी पराभूत करुन दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, भारतीय संघाने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

शफालीची वादळी खेळी अन् भारताचा भक्कम स्कोअर

नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ४ विकेट्स गमावून १९५ धावा केल्या. सलामीवीर शफाली वर्माने ४९ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा केल्या, ज्यात ९ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे शफालीचे पहिले शतक होते. स्मृती मंधानाने १९ चेंडूंमध्ये ३७ धावा करत अत्यंत आक्रमक खेळी केली. तिने ५ चौकार आणि २ षटकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ४० धावांचे योगदान दिले. ऋचा घोषला फक्त २ धावा करता आल्या. अखेरीस, भारती फूलमालीने ५ चेंडूंमध्ये नाबाद ९ धावा जोडल्या, ज्यामुळे भारतीय संघाला २० षटकांत ४ विकेट्स गमावून १९५ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. बांग्लादेशकडून रबिया खान, नाहिदा अख्तर, शंजिदा अख्तर मेघला आणि मरुफा अख्तर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

भारताने बांग्लादेशला चारली धूळ

धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशने सुरुवातीलाच विकेट गमावल्या. कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ क्रीजवर टिकता आला नाही. सलामीवीर दिलारा अख्तरने चार चौकार आणि एका षटकारासह २३ चेंडूंमध्ये २७ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. शर्मिन अख्तरने १० धावा आणि सुलताना खातून १२ नाबाद धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा आणि नंदनी शर्मा यांनी प्रत्येकी तीन, तर श्री चरणीने दोन विकेट्स घेतले. क्रांती गौड आणि श्रेयंका पाटील यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला.

सुवर्णपदकासाठी लंकेविरुद्ध भिडणार

भारतीय संघ आता मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडेल. सुवर्णपदकाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. भारतीय महिला संघाचे सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असेल . २०२२ च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने श्रीलंकेला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी, पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला ८ विकेट्स राखून पराभूत केले. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील कांस्यपदकाचा सामनाही २२ सप्टेंबर रोजीच खेळला जाईल.

Davis Cup 2026: पहिला सेट एकतर्फी, दुसऱ्यातही गेम ओव्हर! सरळ सेटमध्ये सुमित नागलचा पराभव; भारताचं आव्हान संपलं

Web Title: Ind w beat ban w asian games 2026 semifinal india women final

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • asian games 2026
  • IND W vs BAN W
  • india vs Bangladesh
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल
1

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाने उज्बेकिस्तानला रडवले, १९-० अशा एकतर्फी विजयात दीपिकाचे दणादण ८ गोल

T-20 International मध्ये स्मृती मंधानाने शिखर गाठले, दिग्गजांना मागे सारत ‘हा’ विक्रम रचला आपल्या नावे
2

T-20 International मध्ये स्मृती मंधानाने शिखर गाठले, दिग्गजांना मागे सारत ‘हा’ विक्रम रचला आपल्या नावे

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
3

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा
4

Asian-Games : भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्याने ‘एशियन गेम्स 2026’च्या महाकुंभाला सुरुवात, मनु-पवनने क्रीडानगरीत दिमाखात फडकवला तिरंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.