Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?

IND W Ban W Asian Games 2026 Semi Final Schedule: आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचे उपांत्य फेरीचे सामने सध्या सुरू आहेत. भारत बांग्लादेशविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 19, 2026 | 02:04 PM
IND W Ban W Asian Games 2026

IND W Ban W Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • सेमीफायनलची रंगत वाढली
  • भारत-बांग्लादेश भिडणार
  • LIVE सामना कधी आणि कुठे पाहायचा?
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत ( Asian Games 2026) महिला क्रिकेटचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी पूर्ण झाली आहे. चार संघांनी शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारत आणि बांग्लादेश भिडणार आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. नुकतेच आशिया कपच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ आमनेसामने आले होते, ज्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला होता. यावेळीही भारत एक प्रबळ दावेदार आहे. हा सामना कधी आणि कुठे रंगणार, जाणून घ्या.

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

भारत-बांग्लादेश सामना किती वाजता सुरू होणार?

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि बांग्लादेशचे महिला क्रिकेट संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हा सामना २० सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सामन्याला सुरूवात होईल . नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सकाळी १० वाजता होईल. जर सामना पूर्ण षटकांपर्यंत चालला, तर तो दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संपेल. भारतीय महिला संघाला केवळ पदकासाठीच नव्हे, तर सुवर्णपदकासाठीही दावेदार मानले जाते. भारत विरुद्ध बांग्लादेश सामना जिंकणाऱ्या संघाचे पदक निश्चित होईल.

कुठे पाहाल लाइव्ह अॅक्शन?

भारत-बांग्लादेश सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर केले जाईल. स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल फोनवर पाहण्यासाठी, तुम्ही सोनी लिव्ह ॲप डाऊनलोड करु शकता, परंतु,तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे.

उपांत्यपूर्व फेरीत भारताचा प्रभावी विजय

उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना जपानशी झाला. भारतीय संघाने हा सामना अगदी सहज जिंकला. जपानने प्रथम फलंदाजी केली आणि त्यांचा संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला. श्री चरणीच्या फिरकी गोलंदाजीसमोर कोणीही टिकू शकले नाही. तिने चार विकेट्सले. तसेच,शफाली वर्माने दोन महत्वपूर्ण विकेट्स घेतले. भारतीय संघाने अवघ्या पाच षटकांत सहजपणे लक्ष्य गाठले आणि आठ विकेट्सने शानदार विजय मिळवला. याविजयासह त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. शफालीने सर्वाधिक ४० धावा केल्या आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

भारतीय संघ: शफाली वर्मा, स्मृति मंधाना, गुनालन कमलिनी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष, दीप्ति शर्मा, श्रेयंका पाटिल, श्री चरणी, क्रांति गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी, राधा यादव.

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

Web Title: Ind w vs ban w asian games 2026 semi final live streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • asian games 2026
  • IND VS BAN
  • IND w vs AUS W

संबंधित बातम्या

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral
1

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
2

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
3

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?
4

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.