
फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये शेवटचा साखळी सामना काल पार पडला पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. 29 ऑक्टोबरपासून सेमीफायनलचे सामने सुरु होणार आहेत. पहिला सामना हा इंग्लड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे तर २०२५ च्या महिला विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. कांगारू संघाला हरवणे हरमनप्रीत कौर आणि कंपनीसाठी सोपे नसेल.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यत या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाही त्यामुळे कांगारुचे मोठे आव्हान भारतासमोर असणार आहे. यामुळे टीम इंडियाचा तणाव आधीच वाढला आहे. भारताची सामना जिंकणारी सलामीवीर प्रतिका रावल गंभीर जखमी झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तिला दुखापत झाली. बीसीसीआयने आता या प्रकरणाची अपडेट दिली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील महिला विश्वचषक लीग स्टेजचा अंतिम सामना रद्द करण्यात आला. सामन्यावर पावसाचे ढग होते आणि मैदान पूर्णपणे ओले होते. दरम्यान, बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना प्रतिका रावलचा पाय मुरगळला. बीसीसीआयने एक अपडेट दिली की तिच्या गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली आहे. प्रतिकाला नीट उभे राहता येत नव्हते आणि वैद्यकीय पथकाने तिची तपासणी केल्यानंतर तिला मैदानाबाहेर काढले गेले. प्रतिका या स्पर्धेत टीम इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे.
🚨 UPDATE#TeamIndia all-rounder Pratika Rawal sustained an injury to her knee and ankle while fielding in the 1st innings against Bangladesh. The BCCI Medical Team is closely monitoring her progress.#WomenInBlue | #CWC25 | #INDvBAN pic.twitter.com/JDocwJEF9A — BCCI Women (@BCCIWomen) October 26, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वीची तिची दुखापत ही भारतीय संघासाठी वाईट बातमी आहे. बीसीसीआयने सांगितले की रावलच्या दुखापतीचे अधिक मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. प्रतिका रावलने टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली आणि महिला विश्वचषकात तिने चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशने सामन्यात १२० धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि प्रतिका फलंदाजी करत नव्हती. अमनजोत कौर स्मृती मानधनासोबत सलामीला आली.
दोघांनी ५० धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या आत्मविश्वासाने सामना खेळेल. तथापि, ऑस्ट्रेलियन संघासाठीही परिस्थिती सोपी नसेल, कारण त्यांची कर्णधार एलिसा हीली देखील दुखापतग्रस्त आहे, ज्यामुळे तिला खेळणे कठीण होत आहे.