IND W vs NZ W: Mandhana-Rawal's explosive innings puts Dhoni ahead of Rohit-Gil pair; 'These' legends' world record in danger
ND W vs NZ W, Mandhana-Pratika Raval Historic Record : आज महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात असून पावसामुळे खेळ थांबला आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ४८ ओव्हरपर्यंत २ विकेट्स गमावून ३२९ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रतीका रावल आणि स्मृती मानधना या सलामी जोडीकडून पुरुष क्रिकेट संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी रचलेला विक्रम मोडण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मानधना आणि प्रतीका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची मोठी भागीदारी रचली. महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय सलामीवीराने केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरलेली आहे.
हेही वाचा : IND W vs NZ W : न्यूझीलंडविरुद्ध प्रतीका रावलचा शतकी तडाखा! विश्वविक्रमाच्या यादीत ‘रॉयल’ एंट्री
२०२५ या वर्षात प्रतिका रावल आणि स्मृती मानधना या सलामी जोडीने मिळून एकदिवसीय सामन्यात १,५५७ धावा जोडल्या आहेत. यासह, त्यांनी २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यात १,५२३ धावा जोडणाऱ्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीला देखील आता पिछाडीवर टाकले आहे. कॅलेंडर वर्षामध्ये सलामी जोडी म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये मानधना आणि प्रतीकाची जोडी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने १९९८ मध्ये केलेल्या विक्रमाला मागे तकणयाची शक्यता आहे. सचिन आणि गांगुलीने १९९८ मध्ये सलामीवीर म्हणून १,६३५ धावा जोडल्या होत्या. मानधना आणि प्रतीकाला हा विक्रम मोडण्यासाठी केवळ आता ७९ धावांची आवश्यकता आहे.
एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीच्या भागीदारीत सर्वाधिक धावा-पुरुष किंवा महिला खालीलप्रमाणे
*या वर्षी महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पुढील सर्वोत्तम कामगिरी ही लॉरा वोल्वार्ड आणि तझमिन ब्रिट्स यांच्यातील ९७२ धावांची आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रतीका रावलने १३४ चेंडूत १२२ धावा केल्या आहेत. यामध्ये तिने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले आहेत. तर मानधनाने ९५ चेंडूत १०९ धावांची खेळी कळे आहे. ज्यामध्ये तिने ४ षटकार आणि १० चौकार मारले आहेत. दोघांनी २१२ धावांची मोठी भागीदारी रचून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले आहे. या दोन्ही फलंदाजांकडून २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी रचण्याची ही दुसरी वेळ ठरली.
हेही वाचा : IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं