प्रतिका रावल आणि स्मृती मानधना(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs NZ W, Women’s World Cup 2025 : महिला विश्वचषक 2025 मध्ये आज 23 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यायाधी न्यूझीलंड महिला संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताची सुरवात दमदार झाली आहे. भारतीय सलामीवीर जोडी प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेट्ससाठी २१२ धावांची महाकाय भागीदारी केली आहे. या दरम्यान स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी विश्वचषकातील पहिले शतक झळकवले आहे.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने फक्त ८८ चेंडूमध्ये तिचे धडाकेबाज शतक पूर्ण केले. हे मानधनाचे चालू विश्वचषकातील पहिलेच शतक ठरले आहे. नवी मुंबईतील या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजील सुरवात करत मानधनाने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीने दमदार सुरुवात केली. मानधनाने सलग तिसऱ्या सामन्यात ५० धावांचा टप्पा पार केला आहे. ओलांडला, परंतु यावेळी स्मृती मानधनाने शतक पूर्ण होताच ती सुझी बेट्सची शिकार ठरली. मानधनाने ९५ चेंडूंचा सामाना करत १०९ धावा केल्या. या दरम्यान तिने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.
हेही वाचा : IND vs AUS 2nd ODI : अॅडलेडमध्ये गिल नापास; भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मलिका विजय
मानधनाची महिला विश्वचषक २०२५ मध्ये सुरुवात खराब राहिली होती. ती तिच्या पहिल्या तीन डावात ३० धावांपर्यंत पोहोचू शकली नव्हती. मात्र, स्टार सलामीवीर तिच्या फॉर्ममध्ये पुन्हा परतली आणि खोऱ्याने धावा काढण्यास तिने सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकवले. त्यानंतर स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्ध स्फोटक खेळी करत भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. मानधनाने ३१ व्या षटकात १ धाव घेत या विश्वचषकातील तिचे पहिले शतक झळकवले तर कारकिर्दीतील तिचे १४ वे शतक ठरले आहे. मानधनाचे महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हे तिसरे शतक ठरले आहे. यापूर्वी तिने २०१७ आणि २०२२ च्या विश्वचषकात प्रत्येकी एक शतक झळकवण्याची किमया साधली होती. यासह, तिने विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
भारतीय सलामीवीर जोडी प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी भारतीय संघाला मोठी भागीदारी रचून दिली. या दोघींनी शानदार समन्वय दाखवून २१२ धावांची शानदार भागीदारी रचली. स्मृती मानधना १०९ धावा काढून परतल्यानंतर प्रतिका रावलने आपला खेळ सुरूच ठेवला आणि तिने आपले शतक पूर्ण केले. चौफेर फटकेबाजी करत तीने धावा लुटल्या. प्रतिका रावलने १३४ चेंडूचा सामना करत १२२ धावा केल्या. यामध्ये तिने १३ चौकार आणि २ षटकार लगावले. यानंतर तीला अमेलिया केरने तीला माघारी पाठवले.